मी पैसे नाही, चांगला रोल शोधत असतो : आमीर

आमीर खानचा चित्रपट धूम - 3 परदेशातही जोरदार सुरू आहे. आमीर खानने कोणत्याही चित्रपटात काम केलं तरी, आमीरच्या फॅन्स आमीरकडून सर्वोत्तम परफॉर्मची अपेक्षा करतात.

Updated: Jan 6, 2014, 04:39 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आमीर खानचा चित्रपट धूम - 3 परदेशातही जोरदार सुरू आहे. आमीर खानने कोणत्याही चित्रपटात काम केलं तरी, आमीरच्या फॅन्स आमीरकडून सर्वोत्तम परफॉर्मची अपेक्षा करतात.
मिस्टर परफेक्शनिस्ट आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून नेहमीच वेगळी छाप सोडण्याचा प्रयत्न करतो. शाहरूख, सलमान आणि आमीर हे सर्व निर्मात्यांसाठी नेहमीच नंबर वनची पसंत असतात.
आमीर खानला एका चित्रपटासाठी किती पैसे मिळतात, हे आपल्याला माहित आहे, तरीही आमीर म्हणतो की, मी पैशांसाठी काम करत नाही, आणि मला इतर कलाकारांच्या तुलनेने नेहमीच कमी पैसे मिळतात.
आमीर म्हणतो, इतर कलाकारांच्या तुलनेने माझी फी फारच कमी आहे, मी नेहमी चांगल्या रोलच्या शोधात असतो, पैशांच्या नाही, असंही आमीरने म्हटलं आहे.