पाकिस्तान

पाकिस्तानच्या गोळीबारात कोल्हापूरचे जवान राजेंद्र तुपारे शहीद

पाकिस्तानकडून सुरु असलेल्या गोळीबारामध्ये महाराष्ट्रातले जवान राजेंद्र तुपेकर शहीद झाले आहेत. राजेंद्र तुपे हे कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील कारवे गावाचे रहिवासी आहेत.

Nov 6, 2016, 09:18 PM IST

भारतीय तरुणासोबत विवाह करण्यासाठी पोहोचली पाकिस्तानची तरुणी

उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. पण तणाव असतांना देखील पाकिस्तानातील एक तरुणी भारतातील तरुणासोबत विवाह करण्यासाठी भारतात पोहोचली आहे. कराची येथील राहणारी प्रियाचा जोधपूरमधील नरेश याच्यासोबत विवाह होणार आहे.

Nov 6, 2016, 07:51 PM IST

भारताचं कौतूक करत हिलेरी आणि ट्रम्प यांचा पाकिस्तानवर हल्लाबोल

ट्रम्प यांना रशियासोबत चांगले संबंध हवे आहेत. तर हिलेरी यांचं म्हणणं आहे की, ट्रम्प जिंकले तर ते पुतीनचे बाहुली म्हणून काम करतील. अमेरिकेत ८ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे.

Nov 6, 2016, 06:58 PM IST

पाकिस्तानला चोख उत्तर देत अनेक चौक्या केल्या उद्धवस्त

पाकिस्तानजडून सतत गोळीबार सुरु आहे. आज सकाळपासूनच शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे. पाकिस्तानी लष्कराने केलेल्या गोळीबारात २ भारतीय जवान शहीद झाले आहे. भारतीय लष्कराने देखील पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्यूत्तर देत पाकिस्तानी लष्कराच्या अनेक चौक्या उद्धवस्त केल्या आहेत.

Nov 6, 2016, 06:21 PM IST

पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, एक जवान शहीद

पाकिस्तनाकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे. बीएसएफकडूनही त्यांना चोख प्रत्यूत्तर देण्यात येत आहे. पुंछ जिल्ह्यातील मेंढर भागात पाकिस्तानने पुन्हा गोळीबार केला. या गोळीबारात लष्कराचा एक जवान शहीद झाला आहे. पुंछमधील केजीमध्ये पाकिस्तानकडून 2 वेळा घुसखोरीचे दोन प्रयत्न झाले. यावेळी झालेल्या गोळीबारात लष्कराचा एक जवान शहीद झाला. 

Nov 6, 2016, 03:53 PM IST

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, पूंछमध्ये गोळीबार

पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पूंछमधील केजी सेक्टरमध्ये गोळीबार केलाय. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास गोळीबारास सुरुवात झाली. अद्यापही गोळीबार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. 

Nov 6, 2016, 10:04 AM IST

पाकिस्तानी पत्नीला व्हिजा मिळण्यासाठी पतीची सुषमा स्वराजांकडे याचना...

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे एका भारतीय व्यक्तीनं आपल्या पाकिस्तानी पत्नीला व्हिजा मिळण्यासाठी सोशल मीडियावरून मदत मागितली... आणि ट्विटरवर अॅक्टीव्ह असणाऱ्या सुषमा स्वराज यांनी या ट्विटर याचिकेला लगेचच प्रत्युत्तरही दिलं. 

Nov 5, 2016, 06:12 PM IST

पाकिस्तानचे छुपे तळ उद्धवस्त, भारताकडून तोफांचा वापर - सूत्र

पाकिस्तानी तळ नष्ट करण्यासाठी तोफा आणि बंदुकीचा वापर करण्यात आल्याची माहिती, सरकारी सूत्रांनी दिली.

Nov 5, 2016, 07:33 AM IST

BSFच्या जवानांनी दिले असे उत्तर पाक सैनिक गुडघ्यावर आले, दाखविले पांढरे झेंडे

 पाकिस्तान आपल्या कुटील कारवाया थांबवणे बंद करत नाही. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानचे सैनिक सीमा भागातील गावांना जाणूनबुजून  लक्ष्य करीत आहेत. २९ सप्टेंबरला झालेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाक आपली इज्जत वाचविण्याचे प्रयत्न करत आहे. 

Nov 4, 2016, 07:33 PM IST

पाकिस्तानचा मोहम्मद आमीर हास्यास्पदरित्या रन आऊट

पाकिस्तानविरुद्धची तिसरी आणि शेवटची टेस्ट वेस्ट इंडिजनं पाच विकेटनं जिंकली आहे.

Nov 3, 2016, 06:21 PM IST

बीएसएफने उद्धवस्त केलेल्या पाकिस्तानच्या बंकर व्हिडिओ....

 आंतरराष्ट्रीय सीमा आणि एलओसीवर पाकिस्तान लष्कराने युद्धविरामाचे उल्लंघन केल्यानंतर बीएसएफने  मंगळवारी सडेतोड उत्तर दिले. त्याचा व्हिडिओ बीएसएफने जारी केला आहे. 

Nov 2, 2016, 08:37 PM IST

नवाज शरीफ यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ

नवाज शरीफ यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ

Nov 2, 2016, 05:03 PM IST

पाकिस्तानच्या कुरापतीवर नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक

पाकिस्तानच्या कुरापतीवर नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक

Nov 2, 2016, 05:00 PM IST

नवाज शरीफ यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. शरीफ यांच्या पनामा पेपर्स घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. 

Nov 2, 2016, 10:40 AM IST