पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, पूंछमध्ये गोळीबार

पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पूंछमधील केजी सेक्टरमध्ये गोळीबार केलाय. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास गोळीबारास सुरुवात झाली. अद्यापही गोळीबार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. 

Updated: Nov 6, 2016, 10:04 AM IST
पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, पूंछमध्ये गोळीबार title=

श्रीनगर : पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पूंछमधील केजी सेक्टरमध्ये गोळीबार केलाय. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास गोळीबारास सुरुवात झाली. अद्यापही गोळीबार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. 

सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानी सैन्याने जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल ९९वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केलेय. १ नोव्हेंबरला पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात सीमेलगत राहणाऱ्या वस्त्यांना लक्ष्य करण्यात आले होते. यात आठ नागरिक ठार झाले तर २२ जण जखमी झाले.

जम्मू भागातील आंतरराष्ट्रीय सीमेजवळील तसेच नियंत्रण रेषेजवळईल तब्बल ४०० शाळा बंद ठेवण्यात आल्यात. 

पाकिस्तानने केलेल्या गोळीबार तसेच तोफगोळ्यांच्या माऱ्यात एकूण १८ जण ठाक झाले असून यात १२ नागरिकांचा समावेश आहे. तर ८३हून अधिक जण जखमी झालेत.