नेताजी सुभाषचंद्र बोस

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ड्राइव्हर आणि अंगरक्षकाचे निधन

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे ड्राइव्हर आणि अंगरक्षक असणारे कर्नल निजामुद्दीन यांचं निधन झालं आहे. 116 वर्षाचे कर्नल निजामुद्दीन यांनी त्यांच्या वडिलांचं गाव आजमगडमधील मुबारकपूर येथील ढकवामध्ये शेवटचा श्वास घेतला.

Feb 6, 2017, 11:31 AM IST

नेताजींच्या चालकांनी ११६व्या वर्षी उघडले बँक खाते

नेताजीं सुभाषचंद्र बोस यांच्या अस्तित्त्वावर शिक्कामोर्तब करणारे त्यांच्या गाडीचे चालक कर्नल निजामुद्दीन यांनी वयाच्या ११६व्या वर्षी बँक खातं उघडलंय. सध्या कर्नल निजामुद्दीन यांचं वय ११६ वर्षे ३ महिने इतकं आहे. 

Apr 17, 2016, 02:21 PM IST

नेताजींसंबंधित फार्ईल्स पंतप्रधान मोदींनी केल्या सार्वजनिक

आझाद हिंद सेनेचे प्रणेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित १०० गोपनीय फाईल्स मोदी सरकारनं आज सार्वजनिक केल्या.

Jan 23, 2016, 01:20 PM IST

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं गूढ उलगडणार

आज नेताजींबाबतचे गूढ उलगडण्याची शक्यता आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधीत 100 गोपनीय फाईल्स आज नेताजींच्या जयंतीला सार्वजनिक करण्यात येणार आहेत.

Jan 23, 2016, 08:58 AM IST

मला थोडा वेळ झोपायचे आहे, नेताजींचे अखेरचे शब्द

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत आणखी एक खुलासा समोर आलाय. ब्रिटनच्या एका वेबसाईटचने दिलेल्या माहितीनुसार, तैपेईमध्ये विमान दुर्घटनेनंतर बोस यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

Jan 17, 2016, 12:05 PM IST

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य उलगडले?

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 रोजी झाल्याचा दावा एका वेबसाईटनं एका प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्यानं केलाय.

Jan 10, 2016, 09:10 AM IST

२३ जानेवारी २०१६ पासून नेताजींसंबंधीत फाईल्स सार्वजनिक करणार - पंतप्रधान

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी निगडित फाईल्स पश्चिम बंगाल सरकारनं खुल्या केल्यानंतर केंद्र सरकारनंही त्यांच्याजवळील दस्ताऐवज खुले करावे अशी मागणी होती. आज याचसंदर्भात नेताजींच्या ३५ वंशजांनी मोदींच्या निवासस्थानी ७ आरसीआरवर त्यांची भेट घेतली. 

Oct 14, 2015, 09:37 PM IST

कैथी गावातील गुहेत सारदानंद बनून राहिले नेताजी

 नेताजी सुभाष चंद्र बोस अनेक वर्ष उत्तर प्रदेशच्या कैथी गावातील गुहांमध्ये सारदानंद बनून राहिले होते, असा सर्वात मोठा खुलासा करण्यात आला आहे. मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार नेताजी बराच काळ कैथी गावातील गुफेत संत बनून राहिले. कैथी गाव वाराणसी आणि गाजीपूर मार्गावर आहे. नेताजी या ठिकाणी सारदानंद बनून होते. 

Sep 25, 2015, 04:07 PM IST

नेताजींनी चेक गणराज्यच्या महिलेसोबत सुद्धा लग्न केलं होतं?

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याशी निगडित १३ हजार पानांच्या ६४ फाइल्स पश्चिम बंगाल सरकारनं सार्वजनिक केल्या आहेत. त्याची तपासणी केल्यानंतर माहिती मिळालीय की स्वतंत्र भारतात त्यांच्या कुटुंबियांची हेरगिरी केली गेली. १९४५च्या विमान अपघातात खरंच सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला का? यावर अद्याप काहीच स्पष्टपणे सांगता येत नाहीय. आता प्रत्येक फाईलच्या अभ्यासानंतर नवी माहिती पुढे येतेय.

Sep 22, 2015, 06:26 PM IST

स्मारकांचे मारेकरी!

शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की मराठी माणसाचं ऊर अभिमानानं भरून येतं... महाराजांची कीर्ती जगात पोहोचावी, यासाठी अरबी समुद्रात त्यांचा भव्य पुतळा उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारनं आखली आहे.

Jul 27, 2013, 04:00 PM IST