नवी दिल्ली : नेताजीं सुभाषचंद्र बोस यांच्या अस्तित्त्वावर शिक्कामोर्तब करणारे त्यांच्या गाडीचे चालक कर्नल निजामुद्दीन यांनी वयाच्या ११६व्या वर्षी बँक खातं उघडलंय. सध्या कर्नल निजामुद्दीन यांचं वय ११६ वर्षे ३ महिने इतकं आहे.
निजामुद्दीन यांच्या मतदार ओळखपत्र आणि पासपोर्टनुसार त्यांचा जन्म १९०० साली झाल्याचं स्पष्ट होतंय. जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून जपानच्या यात्सुरु कोईदे यांच्या नावाची गिनिज बुकात नोंद होती. त्यांचं वय ११४ वर्ष होतं.. फेब्रुवारीमध्ये त्यांचं निधन झालं.
मात्र कर्नल निजामुद्दीन याचं वय ११६ वर्ष असल्यानं सध्या ते जगातील सर्वात वयस्कर व्यक्ती असल्याचं निष्पन्न झालंय. कर्नल निजामुद्दीन यांची पत्नी अज्बुशा यांचंही वय १०७ वर्ष इतकं आहे.