विजेची बचत करणारे 'अॅटम' अॅप
घरातून बाहेर निघताना आपण सगळे स्विच बोर्ड बंद आहेत ना, याची खात्री करुनच बाहेर पडतो...पण घाईत एखादा दिवा किंवा पंख्याचं बटण सुरु राहिलं तर त्यामुळे वीज तर वाया जातेच परंतु वीजबीलही वाढतं...मात्र पुण्यातल्या स प विद्यालयात बीएससीच्या दुस-या वर्षाला शिकणा-या निरंजन वेलणकरनं यावर तोडगा काढत अॅटम हे अॅप विकसित केलंय. ज्य़ाच्या मदतीनं चालू राहिलेली वीजेची उपकरणं आपण घराबाहेर असतानाही बंद करता येऊ शकतात... 11 वी मध्ये असताना अगदी सहजच निरंजनच्या मनात ही कल्पना आली आणि त्याने त्यावर काम करायला सुरवात केली..
Jan 20, 2018, 11:03 AM ISTमोबाइलने घरातील टीव्ही, फॅन बंद करा
तुमच्या हातातील स्मार्टफोनचा उपयोग केवळ कॉल्स, चॅटींगसाठी नाही तर घरातील टीव्ही, फॅनही तुम्ही याद्वारे सुरू-बंद करु शकणार आहात. एका पुणेकराने हा शोध लावला असून त्याच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. निरंजन वेलणकर असे या तरुणाचे नाव असून तो एसपी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.
Sep 18, 2017, 08:44 PM IST