विजेची बचत करणारे 'अॅटम' अॅप

घरातून बाहेर निघताना आपण सगळे स्विच बोर्ड बंद आहेत ना, याची खात्री करुनच बाहेर पडतो...पण घाईत एखादा दिवा किंवा पंख्याचं बटण सुरु राहिलं तर त्यामुळे वीज तर वाया जातेच परंतु वीजबीलही वाढतं...मात्र पुण्यातल्या स प विद्यालयात बीएससीच्या दुस-या वर्षाला शिकणा-या निरंजन वेलणकरनं यावर तोडगा काढत अॅटम हे अॅप विकसित केलंय. ज्य़ाच्या मदतीनं चालू राहिलेली वीजेची उपकरणं आपण घराबाहेर असतानाही बंद करता येऊ शकतात... 11 वी मध्ये असताना अगदी सहजच निरंजनच्या  मनात ही कल्पना आली आणि त्याने त्यावर काम करायला सुरवात केली..

Updated: Jan 20, 2018, 11:06 AM IST
विजेची बचत करणारे 'अॅटम' अॅप title=

अश्विनी पवार , झी मिडीया ,पुणे : घरातून बाहेर निघताना आपण सगळे स्विच बोर्ड बंद आहेत ना, याची खात्री करुनच बाहेर पडतो...पण घाईत एखादा दिवा किंवा पंख्याचं बटण सुरु राहिलं तर त्यामुळे वीज तर वाया जातेच परंतु वीजबीलही वाढतं...मात्र पुण्यातल्या स प विद्यालयात बीएससीच्या दुस-या वर्षाला शिकणा-या निरंजन वेलणकरनं यावर तोडगा काढत अॅटम हे अॅप विकसित केलंय. ज्य़ाच्या मदतीनं चालू राहिलेली वीजेची उपकरणं आपण घराबाहेर असतानाही बंद करता येऊ शकतात... 11 वी मध्ये असताना अगदी सहजच निरंजनच्या  मनात ही कल्पना आली आणि त्याने त्यावर काम करायला सुरवात केली..

घरातली कुठली उपकरणं सुरू आहेत, याची माहिती  अॅटम हे अॅप एका क्लिक वर देतं पण त्यासाठी ते घरातल्या डिव्हाईसशी  जोडणं आवश्यक आहे ...आपल्या प्रयोगामध्ये निरंजननं  राऊटर प्रमाणे काम करणा-या  डिव्हाईसला घरातल्या स्विच बोर्ड मध्ये बसवून घरातली सगळी उपकरणं त्याच्य़ाशी जोडली ... आणि अॅपव्दारे ही उपकरणं बंद करण्याचा प्रयोग यशस्वी केला...

आपल्या या संशोधनाचं श्रेय निरंजन त्याच्या शिक्षकांना आणि महाविद्यालयाला देतो...त्याचे शिक्षकही या संशोधन अधिकाधिक  लोकांपर्यंत कस पोहोचवता येईल यासाठी सध्या प्रयत्न करत आहेत..आणि याची सुरवात आपल्या महाविद्यालया पासून केलीये... निरंजनचंने शोधलेलं हे उपकरण सध्या स प महाविद्यालयातील फिजिक्स डिपार्टमेंट मध्ये बसविण्यात आलयं...आणि त्यामध्ये आणखी नवीन काय करता येईल याची चाचपणीही सध्या केली जातीये..

उर्जेचा वाढता वापर पाहता तिची बचत करणं ही एक सामाजिक जबाबदारी आहे आणि हा दृष्टीकोन समोर ठेऊन विकसीत केलेलं हे अॅप उर्जा बचतीचा संदेश देणारं तर आहेच..मात्र  मेक इन इंडियाचं एक उत्तम उदाहरणही आहे.