नागपूर हिवाळी अधिवेशन

मुंबई विद्यापीठ ऑनलाईन मूल्यांकन घोटाळ्याच्या चौकशीची घोषणा

मुंबई विद्यापीठ ऑनलाईन मूल्यांकन घोटाळ्याच्या चौकशीची सरकारनं विधानसभेत घोषणा केली. माहिती तंत्रज्ञान सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीकडून चौकशी होईल. या चौकशीनंतर दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. 

Dec 14, 2017, 03:58 PM IST

नोटबंदीच्या मुद्यावरुन नारायण राणेंचा सरकारवर हल्लाबोल

नोटबंदीच्या मुद्यावरुन काँग्रेस आमदार नारायण राणे यांनी, विधानपरिषदेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 

Dec 7, 2016, 06:31 PM IST

नागपूर हिवाळी अधिवेशनात चर्चा रंगली 'वजनदार' मंत्री आणि आमदारांची!

हिवाळी अधिवेशनात आज चर्चा रंगली होती ती 'वजनदार' मंत्री आणि आमदारांची... कोण आहेत हे वजनदार राजकारणी? त्यांचं काय चाललंय? चला पाहूयात, हा खास रिपोर्ट.

Dec 7, 2016, 05:30 PM IST

विधानपरिषदेत गदारोळ : सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने तर बापटांची धमकी

विधानपरिषदेतल्या गदारोळावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आलेत. तालिका सभापतींविरोधात अविश्वास ठराव आणण्याची संसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट यांनी धमकी दिली. गदारोळातच विधानपरिषद कामकाज अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत तहकूब करण्यात आले.

Dec 23, 2015, 03:45 PM IST

केळकर समिती अहवाल विधीमंडळात, चर्चा नाहीच

केळकर समितीचा अहवाल आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात आला. दोन्ही सभागृहात हा अहवाल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा अहवाल मांडण्यात आला असला तरी यावर या अधिवेशनात चर्चा होणार नाही.

Dec 23, 2014, 04:19 PM IST

बरं का, मुंबईतील मेट्रो जानेवारीअखेर धावणार

मुंबईतील मेट्रोला कधी मुहूर्त मिळणार, असा नेहमी प्रश्न विचारला जातो. मात्र, हा प्रश्न आता विरावा लागणार नाही. दोन ते तीनवेळा घेण्यात आलेल्या चाचणीनंतर मेट्रो आता २०१४च्या जानेवारी अखरेपर्यंत धावण्याचे संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिवाळी अधिवेशनात दिलेत.

Dec 11, 2013, 08:16 AM IST

नागपूर हिवाळी अधिवेशन; विरोधक सरकारला घेरण्यास सज्ज

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपूर इथं सुरू होतंय. या अधिवेशनात जादुटोणाविरोधी विधेयक संमत करण्याचा चंग सरकारनं बांधलाय. त्याचबरोबर आदर्श अहवाल, वीज आणि सिंचन घोटाळा, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था या मुद्यांवर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. आठ तारखेला पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल असल्यामुळं नऊ तारखेपासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यावर निवडणुकीचे सावट असणार आहे.

Dec 8, 2013, 02:06 PM IST

अजितदादा- अशोक चव्हाण बॅक बेंचर्स

सिंचन घोटाळ्याच्या आरोपामुळे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

Dec 5, 2012, 08:22 PM IST

अजितदादांचा पत्ता; आमदार निवास रूम नं. ११

सिंचन घोटाळाप्रकरणी श्वेtतपत्रिका प्रसिद्ध करून सरकारने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीनचिट दिलेली असली तरी मंत्रिमंडळातील त्यांच्या पुनर्प्रवेशाबाबत अजून निर्णय झालेला नाही.

Dec 4, 2012, 03:59 PM IST

'हिवाळी अधिवेशना'मुळे दुकानदाराला मनस्ताप

हिवाळी अधिवेशनातल्या झेरॉक्सचे ११ लाखांचे बिल मिळाले नाही म्हणून, एका व्यावसायिकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. संजय पोहरे असं या व्यावसायिकाचं नाव असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अडवणुकीमुळं त्यांचं दोन वर्षांपासूनच ९ लाखांचं बिल थकलंय.

Apr 12, 2012, 08:03 AM IST