केळकर समिती अहवाल विधीमंडळात, चर्चा नाहीच

केळकर समितीचा अहवाल आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात आला. दोन्ही सभागृहात हा अहवाल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा अहवाल मांडण्यात आला असला तरी यावर या अधिवेशनात चर्चा होणार नाही.

Updated: Dec 23, 2014, 04:19 PM IST
केळकर समिती अहवाल विधीमंडळात, चर्चा नाहीच title=

नागपूर : केळकर समितीचा अहवाल आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात आला. दोन्ही सभागृहात हा अहवाल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा अहवाल मांडण्यात आला असला तरी यावर या अधिवेशनात चर्चा होणार नाही.

विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठी अधिक निधी देण्याची सूचना विजय केळकर समितीच्या अहवालात करण्यात आली आहे. प्रादेशिक समान विकासाबाबत दीड वर्षांपूर्वी ही समिती स्थापन करण्यात आली होती.

असमतोल विकासामुळे भविष्यात पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ-मराठवाडा असा प्रादेशिक वाद निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. वैधानिक विकास महामंडळांची रचना बदलण्याची महत्त्वपूर्ण शिफारसही या अहवालात करण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.