www.24taas.com, नागपूर
सिंचन घोटाळाप्रकरणी श्वेtतपत्रिका प्रसिद्ध करून सरकारने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीनचिट दिलेली असली तरी मंत्रिमंडळातील त्यांच्या पुनर्प्रवेशाबाबत अजून निर्णय झालेला नाही. यामुळे पवार यांना चकाचक केलेला देवगिरी हा शासकीय बंगला अजून सरकारने दिलेला नाही.
मात्र त्यांना नागपुरात आमदार निवासात रूम नं. ११ देण्यात आली आहे. पुढील आठवड्यापासून सुरू होणार्याा नागपूर अधिवेशन काळात हाच त्यांचा पत्ता राहणार आहे.
त्यामुळे आता अजित पवार देवगिरीमध्ये राहतील, की आमदार निवासातील रूम नं. ११ मध्ये राहतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान, नारायण राणे मुख्यमंत्री असताना नागपुरात ते एका खासगी हॉटेलमध्ये राहत होते, असे एका वरिष्ठ पत्रकाराने सांगितले. त्याप्रमाणे अजित पवार खासगी हॉटेलमध्ये राहण्याची शक्यता अधिक आहे.