नव्या नोटा

वेल्लोरमध्ये 24 कोटी रुपयांच्या नव्या नोटा जप्त

500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर 2000च्या नव्या नोटा चलनात आल्या आहेत. मात्र या नव्या नोटांचा साठा अनेक ठिकाणी आढळत असल्याच्या घटना समोर येतायत.

Dec 10, 2016, 01:33 PM IST

सुरत शहरात होंडा कारमधून 76 लाखांची रोकड जप्त

केंद्र सरकारनं नोटाबंदी केल्यानंतर देशभरात लहानमोठ्या घटना रोजच्या रोज घडतायत..

Dec 10, 2016, 09:44 AM IST

आजपासून पाचशेच्या जुन्या नोटांनी व्यवहार बंद

पाचशेच्या जुन्या नोटा आता बँकेशिवाय इतर कुठल्याही ठिकाणी स्वीकारल्या जाणार नाहीत. 10 डिसेंबर म्हणजेच आजपासून पाचशेच्या जुन्या नोटांनी व्यवहार करता येणार नाहीत.

Dec 10, 2016, 08:46 AM IST

मुरादाबादमध्ये नागरिकांची बँकेच्या शाखेत तोडफोड

केंद्र सरकारनं नोटाबंदी केल्यानंतर देशभरात लहानमोठ्या घटना रोजच्या रोज घडतायत. उत्तरप्रदेशातल्या मुरादाबादमध्ये स्थानिकांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये तोडफोड केली. 

Dec 10, 2016, 08:08 AM IST

मी सभागृहात बोललो तर भूकंप येईल - राहुल गांधी

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटाबंदीवर सभागृहात आपल्याला बोलण्यास दिले जात नसल्याचा आरोप केलाय. माझे भाषण तयार आहे. मात्र मला बोलायला दिले जात नाहीये. मी जर सभागृहात बोललो तर भूकंप येईल, असे राहुल गांधींनी म्हटलेय.

Dec 9, 2016, 01:52 PM IST

सोलापुरात भरधाव कारने एटीएम रांगेतील दहा जणांना उडवले

सोलापुरातल्या अत्तार नगरमध्ये आज एका दारुड्यानं एक कार एटीएमच्या रांगेत घुसवली. या अपघातात 10 जण जखमी झालेत. त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे.  

Dec 9, 2016, 01:08 PM IST

उद्यापासून तीन दिवस बँका बंद

बँकेची तुमची काही महत्त्वाची कामे असतील तर आजच कामे आटोपून घ्या. कारण उद्यापासून तीन दिवस बँका बंद असणार आहेत. 

Dec 9, 2016, 10:20 AM IST

नोटाबंदीच्या घोषणेनंतर एका रात्रीत विकले गेले 15 टन सोने

पंतप्रधान नरेंद मोदींनी महिन्याभरापूर्वी याच दिवशी म्हणजेच 8 नोव्हेंबरच्या रात्री 500 आणि 1000च्या नोटांवर बंदीबाबतची मोठी घोषणा केली होती. 

Dec 8, 2016, 01:00 PM IST

गोव्यात सापडले दीड कोटी रुपयांच्या नव्या नोटा

 गोवा पोलिसांनी पणजीमध्ये छापा टाकून १.५ कोटी रुपयांच्या नव्या नोटा पकडल्या आहे. पकडण्यात आलेल्या सर्व नोटा या २ हजार रुपयांच्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केले आहे. 

Dec 7, 2016, 10:30 PM IST

आरबीआय 20 आणि 50 रुपयांच्या नव्या नोटा आणणार

आरबीआयने चलनामध्ये 20 रुपये आणि 50 रुपयांच्या नवीन नोटा आणण्याचा निर्णय घेतला आहे.

Dec 4, 2016, 03:55 PM IST

४.७ कोटींच्या नव्या नोटा आयकर खात्याकडून जप्त

 नोट बंदीनंतर नव्या नोटांची सर्वात मोठी जप्ती आयकर खात्याकडून बंगळुरूत करण्यात आली आहे. बंगळुरू आणि विविध ठिकाणी टाकलेल्या धाडीत एकूण ४.७ कोटीच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहे. 

Dec 1, 2016, 10:36 PM IST

बाजारात 500 रुपयांच्या दोन वेगवेगळ्या नव्या नोटा

500 रुपयांच्या नव्या नोटांना बँक तसेच एटीएममध्ये येऊन दोन आठवडे होत नाहीत तोच बाजारात 500च्या दोन प्रकारच्या नोटा पाहायला मिळतायत. 

Nov 25, 2016, 11:43 AM IST