Shardiya Navratri 2024 : सर्वपित्री अमावस्येनंतर अश्विन महिन्याची सुरुवात होते ती देवी मातेच्या नवरात्री उत्सवाने. महाराष्ट्रासह अनेक राज्यात मोठ्या थाट्यामाट्यात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. नवरात्रीत 9 दिवस नवदुर्गाच्या रुपांचे पूजन करण्यात येतं. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता मूर्तीची स्थापना केली जाते. घर घरोघरी घटस्थापना केली जाते. दुर्गादेवीची पूजा आणि व्रत ठेवण्यासोबतच अखंड ज्योत प्रज्वलित करणे अत्यंत शुभ मानलं जातं. असं म्हणतात अखंड ज्योत लावल्याने माता देवी भक्तांची सर्वइच्छा पूर्ण करते.
जर तुम्हीही पण पहिल्यांदाच अखंड ज्योत लावण्याचा विचार करत असाल तर काही नियम आहे जे जाणून घेणं महत्त्वाच आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून किंवा चुका केल्याने मातेचा आशीर्वाद मिळत नाही. सर्व नियमांनुसार अखंड ज्योत प्रज्वलित केल्याने जीवनात सुख, समृद्धी नांदते. यामुळेच नवरात्रीमध्ये देवीची पूजा आणि आरती करण्यासोबतच भक्त अखंड ज्योत प्रज्वलित करतात. जाणून घेऊया अखंड ज्योत लावण्याचे नियम आणि चुका ज्या चुकूनही करू नयेत.
यावेळी शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 12.19 वाजेपासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:58 वाजेपर्यंत असणार आहे. अशा परिस्थितीत उदयतिथी नुसार 3 ऑक्टोबर 2024 रोजी शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. तर 12 ऑक्टोबर 2024 पर्यंत नवरात्री असणार आहे.
नवरात्रीची सुरुवात दुर्गा देवीच्या पूजेसह दिवा लावला केली जाते. दीपप्रज्वलन करताना 'करोति कल्याणम्, आरोग्य धन संपदम्, शत्रु बुद्धी विनाशाय, दीपम् ज्योति नमोस्तुते'. या मंत्राचा जप करा. यासोबतच माऊली म्हणजेच कालवईपासून अखंड ज्योतीची वात बनवावी, हे खूप शुभ मानलं जातं.
अखंड ज्योत असलेला दिवा चुकूनही थेट जमिनीवर ठेवू नये. दिवा नेहमी जव, तांदूळ किंवा गहू यांच्या ढिगाऱ्यात ठेवावा.
अखंड ज्योतीत तूप किंवा तेल वापरता येते. तुपात अखंड ज्योत पेटवत असाल तर उजव्या बाजूला ठेवा. जर तुम्ही तेलात अखंड ज्योत लावत असाल तर ती डाव्या बाजूला ठेवणे शुभ मानलं जातं.
अखंड ज्योत प्रज्वलित केल्यानंतर घर कधीही रिकामे ठेवू नये. काही सदस्यांनी नऊ दिवस घरातच राहावं. अखंड ज्योतीमध्ये तुटलेले किंवा खंडित दिवे वापरू नका.
नवरात्रीच्या शेवटी ज्योत स्वतः विझवू नका. ते स्वतःहूनच विझू द्या.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)