आरबीआय 20 आणि 50 रुपयांच्या नव्या नोटा आणणार

आरबीआयने चलनामध्ये 20 रुपये आणि 50 रुपयांच्या नवीन नोटा आणण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated: Dec 4, 2016, 03:55 PM IST
आरबीआय 20 आणि 50 रुपयांच्या नव्या नोटा आणणार title=

मुंबई : आरबीआयने चलनामध्ये 20 रुपये आणि 50 रुपयांच्या नवीन नोटा आणण्याचा निर्णय घेतला आहे. 20 रुपये आणि 50 रुपयाच्या जरी नवीन नोटा येणार असल्यातरीही जुन्या नोटाही चलनात सुरुचं राहणार असल्याचं सांगण्यात येतं आहे. 20 रुपयाच्या नवीन नोटेमध्ये दोन्ही बाजूच्या पॅनलवर 'एल'हे अक्षर लिहलेले असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आठ नोव्हेंबरला पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आरबीआयनं दोन हजार आणि पाचशे रुपयाच्या नव्या नोटा चलनात आणल्या. आता 20 आणि 50 रुपयांच्या नोटाही चलनात येणार आहेत.