राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची सर्वोच्च न्यायालयात धाव
शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी विकासआघाडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करण्याचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निर्णय रद्द करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आहे.
Nov 23, 2019, 07:53 PM ISTराष्ट्रवादीचे आमदार संजय बनसोडे यांना शिवसेनेने घेतले ताब्यात
महाराष्ट्र राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीची आपल्या आमदारांसोबत बैठक सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय बनसोड यांना मुंबई एअरपोर्ट जवळील सहार हाँटेलमधून शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी ताब्यात घेतले.
Nov 23, 2019, 07:21 PM ISTपुढचं सरकार आपलेच, शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार - उद्धव ठाकरे
काळजी करु नका. पुढचे सरकार आपलेच असेल. मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असणार आहे, असा विश्वास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना दिला आहे.
Nov 23, 2019, 06:46 PM ISTराष्ट्रवादी नेते धनंजन मुंडे माघारी, पक्षाच्या अधिकृत बैठकीला उपस्थित
अजित पवारांसोबत १३ आमदार होते. त्यातील आता सात आमदार माघारी परतले. तर आता राष्ट्रवादीच्या बैठकीला अजित पवारांसोबत असलेले धनंजन मुंडे उपस्थित आहेत.
Nov 23, 2019, 05:45 PM ISTअजित पवारांना धक्का; राजभवनावर गेलेले काही आमदार पुन्हा राष्ट्रवादीकडे
राज्यात एका रात्रीत नाट्यमय घडामोडी होऊन सकाळी ८ वाजता राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांच्या सहकार्याने भाजपचे सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
Nov 23, 2019, 05:18 PM ISTअजित पवारांच्या बंडाने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात, अनेक ठिकाणी निषेध
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडाने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. अनेक ठिकाणी अजित पवारांच्या निषेधार्थ आंदोलन सुरु आहे. तर राष्ट्रवादीचे पक्षाचे अनेक आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे.
Nov 23, 2019, 04:24 PM ISTरात्रीस खेळ चाले... आठ तासांत पलटला 'सत्तास्थापने'चा खेळ!
सरकार बनण्याच्या या सर्व घडामोडी कशा घडल्या तेही जाणून घ्या...
Nov 23, 2019, 03:54 PM ISTअजित पवारांना बारामतीकरांचा पाठिंबा आहे का?
महाविकासआघाडीसोबत चर्चा आणि बैठकीला हजेरी लावणार राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एका रात्रीत भाजपला पाठिंबा दिल्याने अनेकांना धक्का बसला.
Nov 23, 2019, 03:50 PM IST'बाळासाहेब ठाकरे आज स्वर्गात खूश असतील'
बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदींची सत्ता-स्थापनेवर प्रतिक्रिया...
Nov 23, 2019, 02:31 PM ISTअजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांकडून पोलखोल
महाराष्ट्र राज्यात कोणाचे सरकार येणार अशी उत्सुकता असताना होती. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत सरकार स्थापन करण्यास हातभार लावला. त्यानंतर राजकीय घडामोडीला वेग आलाय.
Nov 23, 2019, 01:46 PM ISTशपथविधीनंतर सोशल मीडियावर memes चा धुमाकूळ
नेटीझन्सची सोशल मीडियावर प्रतिक्रिया
Nov 23, 2019, 01:43 PM ISTनिवडणूक झाली तरी तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते त्यांचा पराभव करतील - शरद पवार
राष्ट्रवादीने अजित पवारांची विधीमंडळनेते पदावरुन हकालपट्टी केली आहे. त्याचवेळी राज्यात पुन्हा निवडणूक झाली तर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांची विकासमहाआघाडी एकत्र राहतील आणि त्यांचा पराभव केला जाईल, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
Nov 23, 2019, 01:07 PM ISTअजित पवारांची विधीमंडळ पक्षनेतेपदावरून राष्ट्रवादीकडून हकालपट्टी
राज्यात मोठी राजकीय घडामोड घडल्यानंतर विधीमंडळ पक्षनेतेपदावरून अजित पवार यांची राष्ट्रवादीकडून हकालपट्टी करण्यात आली आहे.
Nov 23, 2019, 12:42 PM ISTनितीन गडकरी यांचे 'ते' विधान खरं ठरलं
महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा पेच सुटला तरी आता नवीन समीकरण पुढे आले आहे. राष्ट्रवादीचे विधीमंडळाचे गटनेते अजित पवार यांनी भाजपसोबत जात राज्यात सरकार स्थापन करण्यात पुढाकार घेतला आहे.
Nov 23, 2019, 12:09 PM ISTमहाराष्ट्रातून सकाळी ५.४७ वाजता राष्ट्रपती राजवट हटवली
राज्यात १२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
Nov 23, 2019, 11:56 AM IST