देवनार डम्पिंग ग्राऊंड

मुंबई | देवनार डम्पिंग ग्राऊंडमध्ये आग

मुंबई | देवनार डम्पिंग ग्राऊंडमध्ये आग

Mar 19, 2018, 10:20 PM IST

देवनार डम्पिंग ग्राऊंडवर वीज निर्मिती प्रकल्प उभारणार

येत्या दहा वर्षात मुंबईतल्या देवनारच्या कचरा डेपोचं अस्तित्व नाहीसं होईल असा विश्वास मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. कचाऱ्याच्या डोंगरांची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक असणारा पाचशे एकहत्तर कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारनं मंजूर केलाय. त्यामुळे येत्या दोन ते तीन वर्षात हे डोंगर नाहीसे करण्यात पालिकेला यश येईल असं अधिका-यांचं म्हणणं आहे. 

Dec 8, 2017, 11:53 AM IST

देवनार डम्पिंग ग्राऊंड आग प्रकरणी आणखी चौघांना अटक

देवनार डंपिंग ग्राऊंडला लागलेल्या आगी प्रकरणी रविवारी पुन्हा ४ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता 13 झाली. याआधीच याप्रकरणी 9 भंगार माफियांना अटक करण्यात आलीय. त्यांना शनिवारी कुर्ला न्यायालयानं 14 दिवसांची न्यायायलीन कोठडी सुनावली.

Apr 17, 2016, 08:19 PM IST

आगीवरून भाजप-शिवसेनेमध्ये भडका

देवनार कचराडेपोला वारंवार लागणा-या आगीवरुन किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते रामदास कदम यांची जोरदार खडाजंगी झाली.

Mar 28, 2016, 07:30 PM IST

देवनार डम्पिंग ग्राऊंड आगीने घेतला चिमुकलीचा बळी

अखेर ज्याची भीती होती तेच झालंय. देवनार डम्पिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीनं एका चिमुकलीचा बळी घेतलाय. मात्र आपले नेते दंग आहेत या आगीचं राजकारण करण्यात. धुरामध्ये गुदमरणाऱ्या नागरिकांना या पुढाऱ्यांशी काही देणंघेणं नाही. त्यांना हवाय या समस्येवर कायमस्वरुपी इलाज.

Mar 23, 2016, 09:40 PM IST

आग विझवण्यासाठी 10 लाख 78 हजार लीटर पाण्याचा वापर

देवनार डम्पिंग ग्राऊंडला लागलेली आग विझवण्यासाठी तब्बल 10 लाख 78 हजार पिण्याचं पाणी वापरण्यात आल्याचं समोर आलंय. आग लागल्यानंतर देवनार कत्तलखाना आणि आरसीएफमधून लाखो लीटर पिण्याचं पाणी आणण्यात आलं आणि त्याच्या मदतीनं ही आग विझवण्यात आली. 

Mar 22, 2016, 08:04 AM IST

देवनारच्या डंपिंग ग्राऊंडला पुन्हा आग

मुंबईतल्या पूर्व उपनगरांच्या क्षितिजावर पुन्हा एकदा धुरांचं साम्राज्य उभं राहिलंय. रविवारी देवनार कचरा डेपोला पुन्हा एकदा आग लागली. 

Mar 21, 2016, 07:47 AM IST