आगीवरून भाजप-शिवसेनेमध्ये भडका

देवनार कचराडेपोला वारंवार लागणा-या आगीवरुन किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते रामदास कदम यांची जोरदार खडाजंगी झाली.

Updated: Mar 28, 2016, 07:30 PM IST
आगीवरून भाजप-शिवसेनेमध्ये भडका title=

मुंबई: देवनार कचराडेपोला वारंवार लागणा-या आगीवरुन किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते रामदास कदम यांची जोरदार खडाजंगी झाली. 

देवनार कचरा डेपोला वारंवार लागणा-या आगीची मुख्यमंत्र्यांनी किंवा आयुक्तांनी SIT मार्फत चौकशी करावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. 

यावर संतप्त झालेल्या शिवसेना नेते रामदास कदम यांनी सोमय्यांवर जोरदार टीका केलीये. आग लावणारे भाजपाचे नेते आहेत म्हणून त्यांना पकडले जात नाही असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. 

राजकीय पोळी भाजण्यासाठी अशिष शेलार आणि किरीट सोमय्या असले आरोप करत असल्याचं कदम म्हणाले आहेत.