मुंबई : मुंबईतल्या पूर्व उपनगरांच्या क्षितिजावर पुन्हा एकदा धुरांचं साम्राज्य उभं राहिलंय. रविवारी देवनार कचरा डेपोला पुन्हा एकदा आग लागली.
अग्निशमन दलाच्या तब्बल १६ गाड्या देवनार कचरा डेपो मध्ये लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी रवाना झाल्या आहेत. गेल्या महिन्यात या कचरा डेपो मध्ये लागलेल्या आगीवर प्रचंड राजकारण पेटले होते.
कचरा डेपोमध्ये उपाय योजना केल्या जातील असे देखील प्रशासनाने आश्वासन दिले होते. परंतु या आगीमुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. आगीमुळे देवनार परिसरात प्रचंड धुराचे लोट निर्माण झाले असून रहिवाशी मात्र प्रचंड त्रस्त झालेत. अजूनही ही आग विझवण्याचं काम अग्निशमनदलाकडून सुरु आहेत.