जपानचे पंतप्रधान

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी सहपत्नीक महात्मा गांधींच्या प्रतिमेला केलं अभिवादन

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी आपल्या पत्नीसह साबरमती आश्रमाला भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अहमदाबादमधून ८ किलोमीटरचा रोड शो करत मोदी आणि आबेंनी साबरमती आश्रमाला भेट दिली.

Sep 13, 2017, 05:09 PM IST

पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान आबे यांचा ओपन जीपमधून रोड शो

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे ओपन जीपमधून साधारण दीड तास रोड शो करणार आहेत. विमानतळापासून साबरमती आश्रमपर्यंत हा रोड शो असणार आहे. या दरम्यान भारतीय संस्कृतीची झलक त्यांना दाखवण्यात येणार आहे.

Sep 13, 2017, 04:14 PM IST

बौद्ध भिक्षूकांनी केलं जपानच्या पंतप्रधानांचं स्वागत

शिंजो आबेंच्या स्वागतासाठी कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि देशाच्या विविध भागातून बौद्ध भिक्षूकही अहमदाबादमध्ये दाखल झाले होते. त्यांनी पंतप्रधान शिंजो आबे यांचं विमानतळावर स्वागत केलं. जपान हा बौद्ध धर्मीय देश आहे. त्यामुळे जपानच्या लोकांच्या भावना या भारताशी देखील जुळलेल्या आहेत.

Sep 13, 2017, 04:01 PM IST

जपानचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार

जपानचे पंतप्रधान शिंजो अबे सप्टेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहेत.

Aug 18, 2017, 10:03 AM IST