पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान आबे यांचा ओपन जीपमधून रोड शो

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे ओपन जीपमधून साधारण दीड तास रोड शो करणार आहेत. विमानतळापासून साबरमती आश्रमपर्यंत हा रोड शो असणार आहे. या दरम्यान भारतीय संस्कृतीची झलक त्यांना दाखवण्यात येणार आहे.

Updated: Sep 13, 2017, 04:14 PM IST
पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान आबे यांचा ओपन जीपमधून रोड शो title=

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे ओपन जीपमधून साधारण दीड तास रोड शो करणार आहेत. विमानतळापासून साबरमती आश्रमपर्यंत हा रोड शो असणार आहे. या दरम्यान भारतीय संस्कृतीची झलक त्यांना दाखवण्यात येणार आहे.

अहमदाबादच्या मार्गावर शिंजो आबेंना गुजरातची संस्कृतीही दाखवण्याचा प्रयत्नही होणार आहे. गुजराती लोकनृत्यानं आबे यांचं स्वागत होणार आहे. शिंजो आबेंच्या स्वागतासाठी कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि देशाच्या विविध भागातून बौद्ध भिक्षूकही अहमदाबादमध्ये दाखल झाले होते. त्यांनी मंत्रउच्चार करत शिंजो यांचं स्वागत केलं आणि एक प्रकारे शांतीचा संदेश दिला.