बौद्ध भिक्षूकांनी केलं जपानच्या पंतप्रधानांचं स्वागत

शिंजो आबेंच्या स्वागतासाठी कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि देशाच्या विविध भागातून बौद्ध भिक्षूकही अहमदाबादमध्ये दाखल झाले होते. त्यांनी पंतप्रधान शिंजो आबे यांचं विमानतळावर स्वागत केलं. जपान हा बौद्ध धर्मीय देश आहे. त्यामुळे जपानच्या लोकांच्या भावना या भारताशी देखील जुळलेल्या आहेत.

Updated: Sep 13, 2017, 04:01 PM IST
बौद्ध भिक्षूकांनी केलं जपानच्या पंतप्रधानांचं स्वागत title=

अहमदाबाद : शिंजो आबेंच्या स्वागतासाठी कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि देशाच्या विविध भागातून बौद्ध भिक्षूकही अहमदाबादमध्ये दाखल झाले होते. त्यांनी पंतप्रधान शिंजो आबे यांचं विमानतळावर स्वागत केलं. जपान हा बौद्ध धर्मीय देश आहे. त्यामुळे जपानच्या लोकांच्या भावना या भारताशी देखील जुळलेल्या आहेत.

अहमदाबादच्या मार्गावर शिंजो आबेंना गुजरातची संस्कृतीही दाखवण्याचा प्रयत्नही होणार आहे. गुजराती लोकनृत्यानं आबे यांचं स्वागत होणार आहे. आबे यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.