गोवा

काँग्रेसची नाती, भाजपला मुद्दे !

गोव्यात सात वर्ष सत्तेत राहिलेल्या काँग्रेसच्या मंत्री आणि आमदारांनी विधानसभेसाठी त्यांच्याच कुटुंबियांना उमेदवारी वाटून घेतली आहे आणि हा मुद्दा लावून धरत विरोधी पक्षाने रान उठवल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.

Feb 15, 2012, 04:07 PM IST

गोव्यात सनबर्न पार्टीची धूम

गोव्यातल्या जगप्रसिद्ध सनबर्न पार्टीला कांदोळी बीचवर सुरुवात झालीय. आशियातल्या या सर्वात मोठ्या समजल्या जाणा-या सनबर्न पार्टीला, तरुणाईची झुंबड उडालीय.

Dec 30, 2011, 09:43 AM IST

गोवा ट्रीप महाग भारी, त्यापेक्षा लंडनवारी बरी

न्यू ईयर साजरा करण्यासाठी असणारा हॉटस्पॉट म्हणजे 'गोवा'. निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली उधळण याने साहजिकच अनेक पर्यटकांचे पाय आपसूकच वळतात, आणि त्यात न्यू ईयर म्हंटल तर पाहायालाच नको.

Dec 25, 2011, 02:57 PM IST

निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर ?

निवडणूक आयोग पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणीपूर, पंजाब आणि गोवा राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमध्ये फेब्रुवारीत पाच टप्प्यात निवडणुका होतील अशी शक्यता आहे. इतर चार राज्यांमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होतील. मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय.कुरेशी या संबंधी घोषणा करतील आणि त्यानंतर या पाच राज्यांमध्ये आचार संहिता लागु होईल.

Dec 24, 2011, 04:22 PM IST

येवा कोकण आपलाच असा

दरवर्षी नाताळ आणि थर्टीफर्स्टचा मुहूर्त साधत लाखो पर्यटक गोव्याकडे धाव घेत असतात. यामधे विदेशी पर्यटकांची संख्या अधिक असते. मात्र यंदा पर्यटकांचा ट्रेंड काहीसा बदलला आहे. विदेशी पर्यटक नाताळनिमित्त आत्तापासूनच कोकणात दाखल झाले आहेत.

Dec 22, 2011, 04:36 AM IST

गोवा मुक्ती सुवर्णमहोत्सव साजरा

गोवा मुक्ती सुवर्णमहोत्सवाच्या निमित्त गोवा सरकारच्या वतीनं कृतज्ञता म्हणून ऑपरेशन विजयमध्ये सहभागी झालेल्या सैनिकांचा सन्मान करण्यात आला. पन्नास वर्षापूर्वी पोर्तूगीजांची राजवट उलथवून लावण्यात नौदल, वायूदल आणि सेनादलातील सैनिकांनी महत्वाची कामगिरी बजावली होती.

Dec 19, 2011, 05:49 AM IST

'3 इडियट्स' ओलांडणार चीनची भिंत

बॉक्सऑफीसवर लोकप्रियतेचा उच्चांक गाठणारा 'थ्री इडियट्स' सिनेमा आता चीनी रसिकांनाही मोहून टाकणार आहे. कारण ८ डिसेंबरला तब्बल ९०० प्रिंट्ससह हा सिनेमा चीनमध्ये रिलीज होतोय. विधू विनोद चोप्रा यांनी गोव्यातल्या इफ्फीत ही माहिती दिली.

Dec 3, 2011, 03:14 PM IST

किंग खानच्या हस्ते 'इफ्फी'चे उद्घाटन

गोव्यात भरणाऱया आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) उद्घाटन २३ नोव्हेंबरला मडगाव येथे बॉलिवूड सुपरस्टार किंग खान याच्या हस्ते होणार आहे

Nov 21, 2011, 07:27 AM IST

गोवा खाण घोटाळा, लोकलेखा समितीचे ताशेरे

गोव्यातील हजारो कोटींच्या खाण घोटाळ्यासंदर्भात सार्वजनिक लोकलेखा समितीनं ताशेरे ओढले आहेत. गोव्यातून निर्यात करण्यात आलेलं 50 टक्के खनिज बेकायदेशीर असल्याचं या समितीच्या अहवालात म्हटंल आहे.

Oct 7, 2011, 01:21 PM IST