गोवा खाण घोटाळा, लोकलेखा समितीचे ताशेरे

गोव्यातील हजारो कोटींच्या खाण घोटाळ्यासंदर्भात सार्वजनिक लोकलेखा समितीनं ताशेरे ओढले आहेत. गोव्यातून निर्यात करण्यात आलेलं 50 टक्के खनिज बेकायदेशीर असल्याचं या समितीच्या अहवालात म्हटंल आहे.

Updated: Oct 7, 2011, 01:21 PM IST

झी 24 तास वेब टीम, गोवा

[caption id="attachment_1933" align="alignleft" width="300" caption="गोवा खाण घोटाळा"][/caption]

 

गोव्यातील हजारो कोटींच्या खाण घोटाळ्यासंदर्भात सार्वजनिक लोकलेखा समितीनं ताशेरे ओढले आहेत. गोव्यातून निर्यात करण्यात आलेलं 50 टक्के खनिज बेकायदेशीर असल्याचं या समितीच्या अहवालात म्हटंल आहे. समितीनं तयार केलेला अहवाल विरोधी पक्षनेते मनोहर पर्रिकर यांनी विधानसभाअध्यक्ष प्रतापसिंग राणे यांना सादर केला. यावेळी हा घोटाळा हजारो कोटींचा असल्याचं सांगत त्यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

 

खाण घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्री फारसे गंभीर नाहीत. घोटाळेबाजांवरील कारवाई करण्याऐवजी मुख्यमंत्री त्यांना पाठिशी घालत आहेत असा आरोपही पर्रिकर यांनी केला आहे. कामत यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळतलं हे शेवटचं अधिवेशन असल्यानं भाजप सत्ताधा-यांना कोंडीत पकडण्यासाठी आक्रमक झाला आहे. भ्रष्टाचार आणि खाण घोटाळ्यावरून भाजप मोर्चाही काढणार आहे. त्यामुळं सत्ताधा-यांना विरोधक जेरीस आणतात का? ह्याचीच उत्सुकता आहे. तसच लोकायुक्तांच्या अहवालावर आता मुख्यमंत्री दिग्गंबर कामत यावर कोणती भूमिका घेतात याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.