गोंधळ

'मॅनेजमेंट' प्रवेशासाठीच्या 'सीईटी' परीक्षेतही गोंधळच गोंधळ!

बिझनेस व्यवस्थापन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'एमबीए'च्या प्रवेश प्रक्रियेत मोठा घोळ झाल्याचं उघड झालंय. ही परीक्षा घेणाऱ्या उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयानं एमबीए सीईटी परीक्षेत आणि त्याच्या निकालात गोंधळ घातल्याचं समोर येतंय. यामुळे परीक्षेला बसलेल्या तब्बल ६० हजार विद्यार्थ्यांना फटका बसतोय.

Mar 31, 2015, 11:17 AM IST

मुंबई पालिकेत गोंधळ : सहा नगरसेवक निलंबित तर सेनेची ४ जणांना नोटीस

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घातल्यामुळे कॉंग्रेसच्या सहा नगरसेविकांवर मंगळवारी १५ दिवसांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर शिवसेनेतून भाजपात प्रवेश केलेल्या औरंगाबादमधील ४ नगरसेवकांना शिवसेनेनं कायदेशीर नोटीस बजावलीय. पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयाकडून ही नोटीस बजावण्यात आली. 

Mar 10, 2015, 10:30 PM IST

दहावीच्या परीक्षेचा सावळा गोंधळ, विद्यार्थ्यांचे हाल

चिपळूणमध्ये दहावीच्या परीक्षेदरम्यान आज प्रचंड गोंधळ झाला. आज हिंदीचा पेपर होता. आलोरे आणि युनायटेड स्कूल या दोन केंद्रांवर साडेचारशे प्रश्नपत्रिका कमी पडल्या. त्यामुळे फोटोकॉपी काढण्याची वेळ आली. 

Mar 5, 2015, 07:03 PM IST

निर्भया प्रकरणावरून राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ

दिल्लीतल्या निर्भया बलात्कार प्रकरणातला आरोपी मुकेश सिंग याच्या मुलाखतीचा मुद्दा आज राज्यसभेत गाजला.

Mar 4, 2015, 02:28 PM IST

शाळेच्या 'ऑनलाईन प्रवेश' प्रक्रियेत गोंधळ

शाळेत मोफत 'ऑनलाईन प्रवेश' प्रक्रियेत गोंधळ

Feb 27, 2015, 10:14 PM IST

बेळगाव येथील नाट्य संमेलनात गोंधळ, जोरदार घोषणाबाजी

बेळगाव नाट्यसंमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात गोंधळाचं नाट्य घडलं. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सीमावासीयांच्या लढ्याकडे लक्ष देण्यासाठी निदर्शनं केली. सीमावासीयांना हक्काचं व्यासपीठ मिळावं, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी विनंती केल्यानंतर हा गोंधळ थांबला आणि त्यानंतर उदघाटन सोहळा पार पडला.

Feb 7, 2015, 06:02 PM IST

औरंगाबाद महापालिकेत 'काटकसरी'चा गोंधळ

औरंगाबाद महापालिकेत 'काटकसरी'चा गोंधळ

Dec 21, 2014, 11:27 AM IST

विधानसभेत विरोधीपक्षनेतेपदावर गोंधळात गोंधळ

विरोधीपक्ष नेतेपदासाठी शिवसेनेकडून एकनाथ शिंदे तर, काँग्रेसकडून राधाकृष्ण विखे-पाटील हे उमेदवार होते. नवनिर्वाचित अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पहिल्यांदा काँग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावाचा ठराव वाचून दाखवला.

Nov 12, 2014, 01:07 PM IST