मुंबई पालिकेत गोंधळ : सहा नगरसेवक निलंबित तर सेनेची ४ जणांना नोटीस

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घातल्यामुळे कॉंग्रेसच्या सहा नगरसेविकांवर मंगळवारी १५ दिवसांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर शिवसेनेतून भाजपात प्रवेश केलेल्या औरंगाबादमधील ४ नगरसेवकांना शिवसेनेनं कायदेशीर नोटीस बजावलीय. पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयाकडून ही नोटीस बजावण्यात आली. 

Updated: Mar 11, 2015, 12:01 AM IST
मुंबई पालिकेत गोंधळ : सहा नगरसेवक निलंबित तर सेनेची ४ जणांना नोटीस title=

मुंबई : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घातल्यामुळे कॉंग्रेसच्या सहा नगरसेविकांवर मंगळवारी १५ दिवसांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर औरंगाबादमध्ये शिवसेनेतून भाजपात प्रवेश केलेल्या ४ नगरसेवकांना शिवसेनेनं कायदेशीर नोटीस बजावलीय. पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयाकडून ही नोटीस बजावण्यात आली. 

हुशारसिंग चव्हाण, जगदीश सिद्ध, प्रिती तोतला आणि सविता सुरे अशी नोटीस पाठवलेल्या नगरसेवकांची नावं आहेत. येत्या महापालिका निवडणुकीत हे चारही नगरसेवक भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत शिक्षा झाल्यास या नगरसेवकांवर ६ वर्ष निवडणूक लढण्यावर बंदी येऊ शकते. महापालिका निवडणूका जवळ येऊ लागताच शिवसेना भाजपमधील वादही वाढत चाललाय.

दरम्यान, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घातल्यामुळे कॉंग्रेसच्या सहा नगरसेविकांवर मंगळवारी १५ दिवसांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये शीतल म्हात्रे, पारूल मेहता, नैना दोशी, अजंता यादव, अनिता यादव आणि वकारुन्निसा अन्सारी या नगरसेविकांचा समावेश आहे. 

या नगरसेविकांनी सभागृहामध्ये रोपे आणली होती. ती महापौरांसमोर ठेवत कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर या सहा नगरसेविकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबनानंतर सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या नगरसेविकांनी सभागृहाबाहेर जाण्यास नकार दिला. त्यामुळे गोंधळात आणखी भर पडली आणि सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

महापौर स्नेहल आंबेकर यांनी स्वाईन फ्लूवर झाडे लावण्याचा उपाय सुचविला होता. त्यांच्या या अजब उपायाचा निषेध करण्यासाठीच या नगरसेविकांनी सभागृहात रोपे आणून ती महापौरांसमोर ठेवल्याची माहिती मिळाली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.