नवी दिल्ली : दिल्लीतल्या निर्भया बलात्कार प्रकरणातला आरोपी मुकेश सिंग याच्या मुलाखतीचा मुद्दा आज राज्यसभेत गाजला.
तिहार जेलमध्ये असलेल्या आरोपीची मुलाखत घेण्याची परवानगी दिलीच कोणी, असा सवाल करत विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला.
या प्रकरणात दोषी असलेल्यांवर अद्याप कारवाई का करण्यात आली नाही. यावरही विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवलीये.
या गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज काही वेळासाठी तहकूब करावं लागलं.
कामकाज पुन्हा सुरू होताच गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी या प्रकरणावर सरकारचं निवेदन सादर केलं. जे जबाबदार असतील त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.