कांदा

कांदा पुन्हा रडवणार, दर वाढलेत

 नाशिक जिल्ह्यात कांद्याचे दर २५०० रूपये क्विंटलपर्यंत गेले आहेत. दुष्काळामुळे कांद्याची आवक घटलीय. त्य़ामुळे कांद्याचे दर तेजीत आहेत. 

Jul 1, 2014, 01:00 PM IST

पावसामुळे कांद्याचंही उत्पादन घटणार

संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे सर्वच शेती मालावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. यात कांदा पीक देखील धोक्यात आले आहे.

Jun 30, 2014, 05:36 PM IST

नाशिकमध्ये कांद्याचे भाव वाढलेत

 नाशिक जिल्ह्यात कांद्याचे कमाल दर २०००च्या वर गेलेत. सरकारने कांदा निर्यातमुल्य ३०० डॉलरने वाढविल्यानंतरही देशांतर्गत मागणी वाढल्यानं कांद्याच्या बाजारभावात सुधारणा होतीय.

Jun 26, 2014, 11:37 PM IST

यंदा कांदा रडवणार, करणार सेंच्युरी?

संपूर्ण राज्यात झालेल्या अवकाळी पावसानं कांद्याच्या येत्या हंगामात उत्पादन घटण्याची शक्यता आहे. परिणामी ऑक्टोबर महिन्यात कांदा दुपटीतीपटीनं महागण्याची शक्यता आहे.

Jun 19, 2014, 07:18 PM IST

कांदा पुन्हा रडवणार, तीन महिन्यानंतर महागणार

सध्या मार्केटमध्ये कांदा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र गारपीट आणि अवकाळी पावसामुळे कांद्यांचं उत्पादन कमी झालंय. त्यामुळे येत्या तीन महिन्यात कांदा महागण्याची शक्यता आहे.

Apr 29, 2014, 08:32 AM IST

`कांदा खाणं बंद करा...किंमती कमी होतील`

‘कांदा खाणंच बंद करा, किंमती आपोआप कमी होतील...’ लोकांना असा सल्ला दिलाय देशातील सर्वोच्च न्यायालयानं...

Jan 11, 2014, 12:04 PM IST

मुंबईत एका कांद्यावरुन घडलं महाभारत!

एक साधा कांदा काय कऱू शकतो... याचं धक्कादायक उदाहरण मुंबईत समोर आलंय... कांद्यामुळं मयुर जाधव चक्क जखमी झालाय आणि त्याला बारा टाके पडलेत...

Dec 2, 2013, 07:31 PM IST

सोने, पैसे नव्हे तर नवी मुंबईत चक्क कांद्याची चोरी

सध्या पेट्रोलपेक्षा कांद्याला भाव आलाय. कांद्याचा भाव गगनाला गेल्याने चक्क चोरांनी सोने, पैसे याकडे दुर्लक्ष करून चक्क कांद्यावर डल्ला मारने सुरू केलेल. अशीच एक घटना नवी मुंबईत उघडकीस आली.

Nov 9, 2013, 08:08 PM IST

बटाट्याचे भाव कडाडले, मुंबईकरांचे वडापाव तोंडचे पाणी पळवणार

कांदा आणि टोमॅटोच्या पाठोपाठ आता बटाटाही ग्राहकांना रडवणार आहे. केंद्र सरकारने काद्याच्या किमान निर्यात दरात भरगोस वाढ केल्याने देशातून होणारी कांदा निर्यात पूर्णपणे ठप्प होणार आहे. एका टनाला ७१४७२ रुपये अशी विक्रमी दर देत कांदा उत्पादक शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. दरम्यान, बटाटा आणखी महाग झाल्यास मुंबईकरांचा आवडता वडापाव आणि बटाटा वडाही तोंडाचे पाणी पळवण्याची शक्यता आहे.

Nov 6, 2013, 09:56 PM IST

कांद्यापाठोपाठ टोमॅटो बटाट्याचे भाव कडाडले

कांद्यापाठेपाठ आता टोमॅटो आणि बटाटाही ग्राहकांना रडवणार आहे. बटाट्याच्या किंमतीही किलोमागे १० ते १५ रूपयांनी वाढल्या असून, त्यामुळे सामान्यांच्या किचनचे बजेटच कोलमडून जाणार आहे.

Nov 6, 2013, 03:57 PM IST

आता निवडणूक नाहीच- शरद पवार

आता मला निवडणूकच लढवायची नाही, असं शरद पवार यांनी म्हटलंय. नुकतंच मुख्यमंत्र्यांनी पवार यांच्या निवडणूक लढवण्याबाबत विधान करून राज्यभर चर्चेला तोंड फोडलं होतं. त्यांना थेट उत्तर देण्याऐवजी पवारांनी कांदा मुद्दा चर्चेत घेऊन उत्तर दिलंय.

Nov 4, 2013, 09:20 AM IST

`कांदा` पण नांदा!

दिल्लीतल्या सत्ताधा-यांनी स्वस्त कांदा उपलब्ध करून देण्यासाठी थेट नाशिकमध्ये ठाण मांडलंय.

Oct 25, 2013, 09:04 PM IST

कांद्यानं केला दिल्लीकरांचा वांदा, 'नाशिक'ला हाक?

कांद्यानं दिल्लीत सेंच्युरी गाठल्यानं सत्ताधारी काँग्रेस सरकारच्या पायाखालची जमीन सरकलीय. कांद्याच्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी थेट नाशिकमधून दिल्लीला कांदा पुरवण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

Oct 24, 2013, 07:31 PM IST

गुड न्यूज : रेशनिंगवर साखर १३ रूपये ५० पैसे किलोने

दिवाळीच्या तोंडावर सरकारनं सामान्य नागरिकांसाठी खरोखरच गुड न्यूज दिली आहे. रेशनिंगवर साखर उपलब्ध करून देण्यासाठी खुल्या बाजारातून साखर खरेदी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, स्वस्त कांदा देण्याचा निर्णय घेतलाय.

Oct 24, 2013, 11:17 AM IST