ओसामाचा मुलगा लपलाय पाकमध्ये?
कुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा मुलगा हमझा बिन लादेन हा पाकिस्तानच्या पेशावर भागात लपला असल्याचे एका वृत्तात म्हटले आहे. अमेरिकन नौदलाने ०२ मे २०११मध्ये अबोटाबाद येथे लादेनच्या घरावर छापा टाकला होता, त्यावेळी हमझा बिन लादेन पेशावरमध्ये दडून बसला होता.
May 7, 2012, 06:49 PM ISTलादेनचा मृतदेह सापडला सुरतच्या समुद्रात?
अलकायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा मृतदेह गुजरातमधील सुरत पासून ३२० किलोमीटर अंतरावर सापडल्याचा दावा कॅलिफोर्नियाच्या ट्रेजर हंटर्सने केला आहे.
May 3, 2012, 03:58 PM ISTलादेनची १० रहस्य
एक वर्षापूर्वी अफगाणिस्तानातील एका एअरबस स्टेशनवरुन अमेरिकेच्या दोन हेलिकॉप्टर्सनी उड्डाण घेतलं..आणि काही वेळातच ते पाकिस्तानातील अबोटाबादमधल्या सैन्य अकादमी जवळ जाऊन पोहोचलं..अमेरिकेच्या कमांडोंनी त्या परिसरातील एका इमारतीवर हल्ला चढवला.
May 2, 2012, 09:21 PM ISTकाबूलमध्ये बॉम्बस्फोट, ६ ठार
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आज बुधवारी अफगणिस्तानच्या दौऱ्यावर रवाना होताच, सकाळी राजधानी काबूलमध्ये तीन बॉम्बस्फोट मालिका घडवून सलामी दिली. या बॉम्बस्फोटांमध्ये सहा जण ठार झाले आहेत. तर १७ जण गंभीर जखमी आहेत.
May 2, 2012, 03:02 PM ISTलादेननंतर अमेरिकेचे टार्गेट जवाहिरी
अमेरिकेला हादरा देणाऱ्या अल कायदाचा मोरक्या ओसामा बिन लादेन याचा खात्मा केल्यानंतर अल कायदाचा नवीन म्होरक्या अयमान अल जवाहिरी याला संपविण्याचा विडा अमेरिकेने उचलला आहे.
May 1, 2012, 06:35 PM ISTशिनवारी अलकायदाचा पाकमधील म्होरक्या!
अलकायदा या कुख्यात दहशतवादी संघटनेने पाकिस्तानसाठीच्या म्होरक्याची निवड केली आहे. फरमान अली शिनवारी असे त्याचे नाव असून तो खैबर या आदिवासी भागात वास्तव्यास आहे. तसेच त्याचे भाऊ जम्मू आणि काश्मीर भागात दहशतवादी कारवाया करीत असल्याची माहिती आहे.
Apr 30, 2012, 04:42 PM IST'२६/११' हल्ल्यामागेही लादेन?
अल-कायदाचा माजी प्रमुख ओसामा बिन लादेन याचाही २६/११च्या मुंबई हल्ल्यामध्ये महत्वाचा सहभाग होता. २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्यात १६६ लोकांचा बळी गेला होता, तर ३०० हून जास्त लोक जखमी झाले होते.
Apr 4, 2012, 09:33 AM IST9/11नंतर पाकमध्ये पाच ठिकाणी लादेनची वस्ती
९/११च्या हल्ल्यानंतर अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानमध्ये पाच ठिकाणी राहत असल्याची माहिती त्याच्या लाडक्या ३० वर्षय बायकोने दिली आहे. पाकमध्ये पाच घरे असल्याचे तिने म्हटले आहे.
Mar 30, 2012, 12:47 PM ISTलादेनच्या तीन पत्नी, पाच मुलांना कोठडी
अमेरिकेने केलेल्या कावाईत कुप्रसिद्ध दहशतवादी ओसामा बिन लादेन मारला गेला असला तरी त्याच्या कुटुंबियांच्या मागील ससेमिरा सुटलेला नाही. लादेनच्या तीन पत्नी आणि पाच मुलांना न्यायालयाने कोठडी ठोठावली आहे.
Mar 19, 2012, 03:45 PM ISTओबामांना ठार मारायचे होते लादेनला
जगावर राज्य अधिराज्य गाजविण्याचा ध्यास बाळगणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना ठार करण्याचा इरादा अल कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा होता. मात्र, ओबामा यांनी हाती सूत्रे घेतल्यानंतर लादेनचा खातमा करण्यात यश मिळविले.
Mar 19, 2012, 01:09 PM ISTओसामाची बॉडी समुद्रात नाही अमेरिकेत
विकीलिक्सने स्ट्रॅटफोर इमेल्स प्रकाशित करत आणखी एक सनसनाटी गोप्यस्फोट केला आहे. अलकायदाचा सर्वेसर्वा ओसामा बिन लादेन याचा मृतदेह समुद्रात दफन करण्यात आला नव्हता असं या इमेलमध्ये नमुद करण्यात आलं आहे.
Mar 7, 2012, 04:35 PM ISTलादेनच्या घराजवळ रॉकेट हल्ला
पाकिस्तानातील अबोटाबाद येथील ओसामा-बिन-लादेनच्या निवासस्थानाजवळ असलेल्या मिलिटरी ऍकॅडमीवर अज्ञात हल्लेखोराने आज सकाळी रॉकेट हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे.
Jan 27, 2012, 12:21 PM ISTपरवेझ मुशर्रफ यांचा कानावर हात
माझ्या काळखंडात दहशतवादी ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानमध्ये राहत असल्याचे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे मी त्याच्या वास्तव्याकडे हेतूत: दुर्लक्ष केले, हा आरोप खोटा आहे, असा दावा पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी केला.
Jan 10, 2012, 09:19 AM ISTअल कायदाचा पाकिस्तानाला अलविदा
पाकिस्तानात अमेरिकेच्या ड्रोण हल्ल्यात ओसामा बिन लादेनसह अल कायद्याचे अनेक महत्वाचे नेते अल्लाला प्यारे झाले, त्यामुळे अल कायदाच्या नेतृत्वाने आता उत्तर आफ्रिकेत स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या ड्रोण हल्ल्यांमुळे अल कायद्याचे अक्षरश: कंबरडं मोडलं.
Dec 26, 2011, 04:39 PM IST