www.24taas.com, काबूल
दहशतवादी ओसामा बिन लादेन याच्या हत्येला आज एक वर्षपूर्ती झाल्याने काबूलमध्ये दहशतवाद्यानी आपला इरादा पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आज बुधवारी अफगणिस्तानच्या दौऱ्यावर रवाना होताच, सकाळी राजधानी काबूलमध्ये तीन बॉम्बस्फोट मालिका घडवून सलामी दिली. या बॉम्बस्फोटांमध्ये सहा जण ठार झाले आहेत. तर १७ जण गंभीर जखमी आहेत.
अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याची हत्या अमेरिकेने केली. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे बराक ओबामा अफगणिस्तानच्या दौऱ्यावर गेले आहेत. काबूल शहरात झालेल्या या स्फोटांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या सहा जणांमध्ये एका सुरक्षा जवानाचाही समावेश आहे. हे स्फोट फॉरेन मिलिटरी एअरबेसजवळ झाले आहेत. या स्फोटांची तालिबानी दहशतवाद्यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे दहशतवात याचा धोका कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.