एनडीटीव्ही इंडियावरची बंदी स्थगित
माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं एनडीटीव्ही इंडिया या हिंदी वृत्तवाहिनीवर घातलेली एक दिवसाची बंदी स्थगित केली आहे. पीटीआयनं सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी दिली आहे. एनडीटीव्हीचे प्रणव रॉय आणि माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकैय्या नायडू यांच्यामध्ये बैठक झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
Nov 7, 2016, 09:22 PM ISTपठाणकोट हल्ल्यावेळी संवेदनशील माहितीचं प्रक्षेपण, 'एनडीटीव्ही'वर एक दिवसाच्या बंदीचा प्रस्ताव
पठाणकोट हल्ल्यावेळी संवेदनशील माहितीचं प्रक्षेपण केल्यामुळे एनडीटीव्ही इंडिया या हिंदी न्यूज चॅनलवर एक दिवसाची बंदी घालावी असा प्रस्ताव माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या समितीनं दिला आहे.
Nov 3, 2016, 08:26 PM IST