पठाणकोट हल्ल्यावेळी संवेदनशील माहितीचं प्रक्षेपण, 'एनडीटीव्ही'वर एक दिवसाच्या बंदीचा प्रस्ताव

पठाणकोट हल्ल्यावेळी संवेदनशील माहितीचं प्रक्षेपण केल्यामुळे एनडीटीव्ही इंडिया या हिंदी न्यूज चॅनलवर एक दिवसाची बंदी घालावी असा प्रस्ताव माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या समितीनं दिला आहे.

Updated: Nov 3, 2016, 08:26 PM IST
पठाणकोट हल्ल्यावेळी संवेदनशील माहितीचं प्रक्षेपण, 'एनडीटीव्ही'वर एक दिवसाच्या बंदीचा प्रस्ताव  title=

नवी दिल्ली : पठाणकोट हल्ल्यावेळी संवेदनशील माहितीचं प्रक्षेपण केल्यामुळे एनडीटीव्ही इंडिया या हिंदी न्यूज चॅनलवर एक दिवसाची बंदी घालावी असा प्रस्ताव माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या समितीनं दिला आहे. नऊ नोव्हेंबर दुपारी एक ते दहा नोव्हेंबर दुपारी एक वाजेपर्यंत चॅनलचं प्रक्षेपण बंद ठेवावे, असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

पठाणकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत एनडीटीव्हीनं लाईव्ह प्रक्षेपण केलं, यामध्ये जिवंत दहशतवादी आणि एअरफोर्सच्या बेसबाबत माहिती देण्यात आल्याचा ठपका या समितीनं ठेवला आहे. या माहितीमुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली, दहशतवाद्यांना माहिती मिळाली तसंच जवान आणि सामान्य नागरिकांना त्यांचा जीव गमवावा लागल्याचं समितीचं म्हणणं आहे.

एनडीटीव्हीनं मात्र समितीचे हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. समितीनं केलेले दावे हा त्यांनी करून घेतलेला समज आहे. आमच्याकडून आधीच सार्वजनिक करण्यात आलेली माहिती दाखवण्यात आल्याचा दावा एनडीटीव्हीनं केला आहे.