आरपीआय

असिम त्रिवेदीला बिग बॉसने घराबाहेर काढले

व्यंगचित्रकार आणि रिअलिटी शो ‘बिग बॉस’च्या घरातील पाहुणा असीम त्रिवेदी याची या कार्यक्रमातील प्रवास संपला आहे.

Nov 3, 2012, 02:07 PM IST

आरपीआय कार्यकर्ते आणि मनसैनिक आमने-सामने

आरपीआय कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मुंबईतल्या कृष्णकुंज निवासस्थानावर काढलेल्या मोर्चावेळी आरपीआय कार्यकर्ते आणि मनसे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्य हाणामारीवर उतरले.

Aug 23, 2012, 04:57 PM IST

‘काँग्रेस सरकार हाय-हाय’

एक नजर टाकुयात मुंबई, डोंबिवली, शिर्डी आणि सोलापूरात आज वेगवेगळ्या पक्षांकडून करण्यात आलेल्या आंदोलनांवर. विशेष म्हणजे या आंदोलनात ला सामान्यांचा सहभागही उल्लेखनीय होता.

May 24, 2012, 04:56 PM IST

पेट्रोल भडकलं... राज्यभर पसरलं...

पेट्रोल दरवाढ... महागाई... आणि त्यात होरपळणारी त्रस्त जनता...
मुंबई - गोवा महामार्ग, नागपूर, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली... आता आणखी कुठे व्हायचं बाकी आहे आंदोलन... जनतेच्या संतापाचा तीव्र उद्रेक...

May 24, 2012, 12:57 PM IST

सचिनच्या सत्काराला परवानगी नाकारली...

मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टीनं आयोजित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रमाला मुंबई पोर्ट ट्रस्टनं परवानगी नाकारली आहे.

Apr 12, 2012, 05:51 PM IST

ठाण्यात राष्ट्रवादीच्या होर्डिंगवर आठवलेंची हरकत

ठाण्यामध्ये राष्ट्रवादीच्या होर्डींगवर आरपीआयचा उल्लेख आहे. त्यावरुन रामदास आठवले यांनी हरकत घेतली आहे.

Feb 6, 2012, 02:38 PM IST

विक्रोळीत शिवसेना विरुद्ध आरपीआय !

शिवसेना, भाजप आणि आरपीआयचे नेते महायुतीचे गोडवे गात असले तरी विक्रोळीत या महायुतीला भगदाड पडलं आहे. शिवसेनेवर नाराज असलेल्या आरपीआयनं थेट शिवसेनेसमोरच आरपीआयचा उमेदवार उभा केला आहे.

Feb 4, 2012, 10:25 PM IST

महापौर राज नव्हे, RPI ठरवेल - आठवले

काल महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. तसचं पत्रकार परिषदेत दावा देखील केला की 'मुंबईचा महापौर हा मीच ठरवेन'. त्यांच्या वक्तव्यावर आरपीआय नेते रामदास आठवले यांनी राज यांना उत्तर देत, सांगितले की मुंबईचा महापौर राज ठाकरे नाही तर, आरपीआय ठरवेल.

Jan 31, 2012, 12:03 PM IST

तर महायुती तोडू – आरपीआय

पुण्यात आरपीआयनं महायुती तोडण्याचा इशारा दिलाय. भाजपच्या आडमुठेपणामुळे युती तुटू शकते, असा इशारा रिपाइंचे जिल्हाध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी दिलाय.

Jan 29, 2012, 11:18 PM IST

महायुतीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीचे जागा वाटप जाहीर झालं आहे. महापालिकेच्या एकूण २२७ जागांपैकी शिवसेनेला १३६ तर भाजपला ६२ आणि आरपीआयला २९ जागा देण्यात आल्या आहेत. रामदास आठवलेंनी ३० जागांची अपेक्षा व्यक्त केली होती तर सेना-भाजपने २५ जागांची तयारी दर्शवली होती. अखेरीस आरपीआयच्या वाट्याला २९ जागा आल्या आहेत.

Jan 9, 2012, 03:46 PM IST

RPIच्या नेत्यांना मस्ती चढली आहे- नामदेव ढसाळ

आरपीआयच्या नेत्यांना मस्ती चढली आहे असं जळजळीत विधान नामदेव ढसाळ यांनी केलं आहे. यापुढे दलित पँथर आरपीआयमध्ये राहणार नाही अशी घोषणाही ढसाळांनी केली. तसंच माझी नाराजी शिवसेनेवर नाही असंही त्यांनी सांगितलं.

Jan 6, 2012, 09:59 AM IST

RPI ला २५ जागा देण्यावर शिक्कामोर्तब

महायुतीतील घटक पक्ष असलेल्या आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला २५ जागा देण्यावर महायुतीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाला असून याबाबत रामदास आठवले यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Jan 5, 2012, 07:39 PM IST

निवडणूक आयोगाविरोधात आठवले कोर्टात

जि.प. आणि नगरपालिका यांच्या निवडणुक कार्यक्रमामुळे आरपीआय गटाने विरोध करत कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरपीआय गट आता या कार्यक्रमाविषयी कोर्टात याचिका दाखल करणार आहे.

Jan 4, 2012, 01:39 PM IST

आरपीआय करणार आज रेलरोको

डॉक्टर बाबासाहेब आंबोडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला इंदू मिलची सर्व साडे बारा एकर जागा मिळावी यासाठी रिपब्लीकन पक्षाचे कार्यकर्ते आज रेलरोको करणार आहेत. डोंबिवलीत रेल्वे स्थानकात सकाळी ११ वाजता रिपाइं कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत.

Dec 19, 2011, 04:01 AM IST

आरपीआयची मुख्यमंत्री कार्यालयावर धडक

इंदू मिलच्या जागेसाठी आता आरपीआयच्या आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयावर धडक मारलीय. मुख्यमंत्र्यांच्या केबिनसमोर या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलीय.

Dec 7, 2011, 02:17 PM IST