आम आदमी पार्टी

राजीनाम्यावरून केजरीवालांनी मागितली जनतेची माफी

‘आम आदमी पार्टी’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी, दिल्लीत सत्ता अर्ध्यावरूनच सोडणं ही आमची चूक झाली यासाठी आम्ही जनतेकडे माफी मागणार असं म्हणत पुन्हा एकदा निवडणुका लढण्याची तयारी केलीय.

May 21, 2014, 11:11 AM IST

`आप`चा सुपडा, `झाडू`नेच केले साफ

भ्रष्टाचारावर बेंबीच्या देटापासून ओरडणाऱ्या आणि हातात झाडू घेऊन आम्ही राजकारणातील घाण साफ करणार अशी आरोळी ठोकणाऱ्या आम आदमी पार्टीला उभी राहण्याआधीच जनतेने नाकारले. झाडू घेऊन मैदानात उतरलेल्या आम आदमी पार्टीला दिल्लीनंतर मुंबईत जनाधार लाभेल हा आशावाद लोकसभा निकालाने फोल ठरला.

May 17, 2014, 02:41 PM IST

मोदींचा `वैवाहिक` प्रकरण पोहचलं कोर्टात...

अहमदाबादच्या एका कोर्टाने बुधवारी पोलिसांना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर `शपथ घेऊन सत्य लपवण्याचा आरोप` करणाऱ्या अर्जावर सत्यता तपासून त्यासंबंधी अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत.

Apr 17, 2014, 03:46 PM IST

`त्यानं` केजरीवालांना भररस्त्यात लगावली थप्पड

शुक्रवारी आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर एका अज्ञात इसमानं हल्ला चढवला. राजधानी दिल्लीच्या दक्षिण पुरी भागात निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यादरम्यान ही घटना घडली.

Apr 4, 2014, 03:54 PM IST

धक्कादायकः आपच्या वेबसाइटवर काश्मीर पाकचा भाग

आम आदमी पार्टीच्या अधिकृत वेबसाईटवरील नकाशात काश्मीर हा पाकिस्तानचा भाग दाखविण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Mar 26, 2014, 09:45 PM IST

गुल पनागला उमेदवारी, `आप` कार्यकर्ते नाराज

बॉलिवूड अभिनेत्री गुल पनाग आम आदमी पार्टीच्या तिकीटावर चंदीगडमधून लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. गुल पनाग हिची उमेदवारी जाहीर झाल्याने अनेक जण नाराज आहेत.

Mar 13, 2014, 05:37 PM IST

व्हिडिओ : केजरीवालांचं `मीडिया फिक्सिंग` उघड

आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या एक व्हिडिओनं यूट्यूबवर सध्या खळबळ उडवून दिलीय. या व्हिडिओनंतर केजरीवाल `मीडिया फिक्सिंग` प्रकरणात अडकले आहेत.

Mar 10, 2014, 11:41 PM IST

मेधा पाटकरांचा राजकीय प्रवेश; प्रस्थापितांना झटका?

`आम आदमी पक्षा`नं लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या पहिल्या २० संभाव्य उमेदवारांची नावं जाहीर केलीत. यातील, वेगवेगळ्या आंदोलनांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असणारं नाव म्हणजे मेधा पाटकर...

Feb 16, 2014, 06:34 PM IST

तयारी लोकसभेची : `आप`चे संभाव्य उमेदवार

अरविंद केजरीवाल यांच्या देखरेखीखाली `आम आदमी पार्टी`नं लोकसभेतही सत्ताधाऱ्यांना धडक देण्याचं ठरवलंय. यासाठी आपच्या लोकसभेसाठी संभाव्य उमेदवारांची एक यादीही जाहीर करण्यात आलीय.

Feb 16, 2014, 04:20 PM IST

`अराजक`नंतर `आप`चा ऑनलाईन `गल्ला` घटला

दिल्लीतील अराजक आम आदमी पार्टीला चांगलंच भोवलंय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रस्त्यावर उतरून केलेलं धरणं आंदोलन आणि स्वतःच कायदा हाती घेण्याचा कायदामंत्री सोमनाथ भारती यांचा खटाटोप आपच्या अंगलट आलाय. गेल्या 17 जानेवारीपासून पक्षाच्या ऑनलाइन देणग्यांमध्ये कमालीची घट झालीय.

Jan 23, 2014, 05:17 PM IST

‘आप’नंतर मनसेच बाप तर राष्ट्रवादी आई!

जनतेला आई-बाप मिळाल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. आम आदमी पार्टीचा प्रभाव देशभर वाढत असताना राज ठाकरेंनी मात्र आपबिप काही नाही, राज्यात मनसेच बाप असल्याचं सांगितलंय. तर राज ठाकरेंच्या दाव्याला राष्ट्रवादीनं जोरदार उत्तर देत मनसे बाप तर राष्ट्रवादी जनतेची आई असल्याचं प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलंय.

Jan 9, 2014, 07:13 PM IST

लोकसभा निवडणूक : `आप`तर्फे निवडणूक लढवायचीय तर...

‘आम आदमी पार्टी’ लोकसभा निवडणूक लढवणार आहे. १५ ते २० जानेवारीपर्यंत उमेदवारांची यादी जाहीर होईल. ज्यात महाराष्ट्रातील मुंबईचे पाच-सहा उमेदवारांचा समावेश असू शकतो, अशी माहिती ‘आप’च्या नेत्यांकडून मिळतेय.

Jan 6, 2014, 10:44 AM IST

अरविंद केजरीवाल यांनी १० खोल्यांचे घर नाकारले

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १० खोल्यांचे घर घेण्याचे नाकारले आहे. आपण छोट्या घरात राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रशासनाला तसे कळविले आहे, अशी माहिती केजरीवाल यांनी दिली.

Jan 4, 2014, 11:39 AM IST

दिल्लीकरांचे सिंघम...केजरीवाल

दिल्ली विधानसभेची ही स्थिती असताना सध्या अरविंद केजरीवाल मात्र दिल्लीकरांचे सिंघम ठरलेत. आल्या-आल्या मोफत पाणी आणि स्वस्त विजेचा निर्णय घेऊन त्यांनी दिल्लीकरांची मनं जिंकली आहेत. मात्र यामुळे बाकीच्या पक्षांची अवस्था बिकट केली आहेच, पण इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही पेचात टाकलंय.

Jan 2, 2014, 09:04 AM IST

<B> <font color=red> LIVE : </font></b> अरविंद केजरीवाल यांची विश्वासदर्शक ठरावावर कसोटी

एकीकडे उत्तर भारत थंडीनं गारठला असताना दिल्लीत मात्र राजकीय वातावरण तापलंय. आज अरविंद केजरीवाल यांची खरी अग्नीपरीक्षा सुरू होतेय. आजचा विश्वासदर्शक ठराव जिंकण्याची त्यांची कसोटी लागणार आहे.

Jan 2, 2014, 08:55 AM IST