आप

दिल्ली विद्यापीठ निवडणुकीत भाजपचे वर्चस्व, चारही जागांवर विजय

दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीत भारतीय विद्यार्थी परिषदेने घवघवीत यश संपादन केले आहे. चारही जागांवर विजय मिळवत आम आदमी पक्षाच्या छात्र युवा संघर्ष संघटनेचे कडवे आव्हान मोडून काढले.

Sep 12, 2015, 02:17 PM IST

आपच्या नेत्या अलका लांबा दगडफेकीत जखमी

आपच्या नेत्या अलका लांबा दगडफेकीत जखमी झाल्यात. दिल्लीत अंमली पदार्थ व्यसनाधिन असणाऱ्यांशी चर्चा करत असताना जमावातील काही जणांनी त्यांच्यावर दगडफेक केली. यात त्यांच्या डोक्याला जखम झाली. अलका लांबा यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Aug 9, 2015, 01:11 PM IST

परदेश दौऱ्यावर मोदी; घराचं वीज बिल - २१,१२,०६७ रुपये!

एखाद्या व्यक्तीचं महिन्याचं लाईट बिल किती असावं? २१ लाख १२ हजार ६७ रुपये... होय, हे एका महिन्याचं विजेचं बिल आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराचं... 

Jul 1, 2015, 06:50 PM IST

मोदींनी नाकारली केजरीवाल यांना भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेट नाकारली आहे. ही भेट नाकारण्यामागे व्यस्तता हे कारण देण्यात आले आहे.

Jun 30, 2015, 11:04 AM IST

VIDEO : 'आप'च्या या जाहिरातीवरून उठलाय वादंग!

आम आदमी पार्टी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा वादात अडकलेत. सध्या वाद सुरू आहे तो केजरीवाल सरकारनं राष्ट्रीय चॅनलवर प्रदर्शित केलेल्या एका जाहीरातीवरून...

Jun 20, 2015, 06:11 PM IST

'आप' आमदार सोमनाथ भारती वादाच्या भोवऱ्यात, ५ वर्षांपासून पत्नीचा छळ

आम आदमी पक्षांच्या नेत्यासमोरचे संकटं काही कमी होत नाहीयेत. तोमर यांच्या अटकेनंतर आता आमदार सोमनाथ भारती वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. भारती चार वर्षांपासून आपला छळ करत असल्याचा आरोप त्यांची पत्नी लिपिका मित्रा यांनी केलाय.

Jun 10, 2015, 08:54 PM IST

कायदामंत्री जितेंद्र तोमर यांचा पदाचा राजीनामा

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील कायदामंत्री जितेंद्र तोमर यांना दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बोगस कायदा पदवी प्रमाणपत्र प्रकरणी जिंतेद्र तोमर यांना अटक करण्यात आली आहे.

Jun 10, 2015, 08:31 AM IST

दिल्लीत 'आप'चा आमदार फरार घोषित

 आपच्या नेत्यांनी दिल्लीत दिवे लावायला सुरूवात केली आहे. कारण आपच्या एका आमदाराला पोलिसांनी आज फरारी घोषित केले आहे, आमदार जर्नेलसिंग यांच्यावर सरकारी अभियंत्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आमदार जर्नेलसिंग यांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

May 5, 2015, 01:34 PM IST

'आप'च्या कुमार 'विश्वास'मुळे, पण एका महिलेच्या संसाराचं पानीपत

 आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते कुमार विश्वास यांच्या एका महिलेशी अनैतिक संबंध प्रकरणाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. एका हिंदी न्यूज पेपरमध्ये ही बातमी छापून आल्यानंतर या बातमीवर आणखी चर्चा होत आहे.

May 4, 2015, 01:53 PM IST