दिल्ली विद्यापीठ निवडणुकीत भाजपचे वर्चस्व, चारही जागांवर विजय

दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीत भारतीय विद्यार्थी परिषदेने घवघवीत यश संपादन केले आहे. चारही जागांवर विजय मिळवत आम आदमी पक्षाच्या छात्र युवा संघर्ष संघटनेचे कडवे आव्हान मोडून काढले.

Updated: Sep 12, 2015, 02:17 PM IST
दिल्ली विद्यापीठ निवडणुकीत भाजपचे वर्चस्व, चारही जागांवर विजय  title=

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीत भारतीय विद्यार्थी परिषदेने घवघवीत यश संपादन केले आहे. चारही जागांवर विजय मिळवत आम आदमी पक्षाच्या छात्र युवा संघर्ष संघटनेचे कडवे आव्हान मोडून काढले.

दिल्ली विद्यापाठाची निवडणूक प्रतिष्ठेची केली गेली होती. कारण आम आदमी पक्षाच्या छात्र युवा संघर्ष संघटनेचे कडवे आव्हान होते. दिल्लीत आम आदमी पार्टीची सत्ता आहे. त्यामुळे या निवडणुकीत चमत्कार होईल, अशी चर्चा होती.

या निवडणुकीत भाजपशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभविप) उमेदवारांनी चारही जागांवर विजय मिळवत प्रतिस्पर्धी उमेदवारांवर मत केली. ‘अभविप’च्या सतिंदर आवाना, सनी देढा, अंजली राणा आणि छत्रपाल यादव या उमेदवारांनी अनुक्रमे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, उप-सचिवासाठीच्या पदांवर विजय मिळवला.

दिल्ली विद्यापीठात भाजपची सत्ता होती. मात्र, ही निवडणूक सोपी नव्हती. आम आदमी पक्षाच्या छात्र युवा संघर्ष संघटनेचे आव्हान उभे केले होते. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार अशी चर्चा होती. मात्र, निवडणूक एकतर्फीच झाली.

शुक्रवारी या निवडणुकीसाठीची मतदानप्रक्रिया पार पडली होती. त्यासाठी ५० महाविद्यालयांतून जवळपास ४२ टक्के मतदान झाले होते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.