आपच्या नेत्या अलका लांबा दगडफेकीत जखमी

आपच्या नेत्या अलका लांबा दगडफेकीत जखमी झाल्यात. दिल्लीत अंमली पदार्थ व्यसनाधिन असणाऱ्यांशी चर्चा करत असताना जमावातील काही जणांनी त्यांच्यावर दगडफेक केली. यात त्यांच्या डोक्याला जखम झाली. अलका लांबा यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Updated: Aug 9, 2015, 04:53 PM IST
आपच्या नेत्या अलका लांबा दगडफेकीत जखमी title=

नवी दिल्ली: आपच्या नेत्या अलका लांबा दगडफेकीत जखमी झाल्यात. दिल्लीत अंमली पदार्थ व्यसनाधिन असणाऱ्यांशी चर्चा करत असताना जमावातील काही जणांनी त्यांच्यावर दगडफेक केली. यात त्यांच्या डोक्याला जखम झाली. अलका लांबा यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

अलका लांबा या चांदणी चौक मतदारसंघातील आपच्या आमदार आहेत. दरम्यान सध्या दिल्ली पोलीस आणि आपच्या नेत्यांमध्ये तूतू-मैंमैं सुरु आहे. या घटनेनंतरही आप नेत्यांनी पोलिसांवर निशाणा साधलाय.
सूचना देऊनही सुरक्षा पुरवली गेली नसल्याचा आरोप अलका लांबा यांनी केला आहे. फक्त तीन पोलीस कर्मचारी पाठवण्यात आलं होतं, त्यांच्या हजेरीतच हल्ला झाल्याचं लांबा यांनी म्हटलं आहे. तर एमसीडी कर्मचाऱ्यांशिवाय लांबा काही दुकानं बंद करण्यासाठी गेल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
 
दरम्यान, संबंधित तरुणाला आम्ही ताब्यात घेतलं असून लांबा यांनी तक्रार नोंदवल्यावर पुढील कारवाई करु' असं पोलिसांनी सांगितलं आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.