नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते कुमार विश्वास यांच्या एका महिलेशी अनैतिक संबंध प्रकरणाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. एका हिंदी न्यूज पेपरमध्ये ही बातमी छापून आल्यानंतर या बातमीवर आणखी चर्चा होत आहे.
या घटनेकडे मीडियाने आता गंभीरपणे पाहण्यास सुरूवात केली आहे, कारण एका महिलेचं जीवन यामुळे धोक्यात आलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार विश्वास सोबत या महिलेचं नाव आल्यानंतर या महिलेला तिच्या पतीने घराबाहेर काढलं आहे.
दुसरीकडे असंही सांगण्यात येतंय की, यावरून दिल्ली महिला आयोगाने आपचे नेते कुमार विश्वास यांना एक नोटीस जारी केली आहे, तसेच मंगळवारी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
सध्या कुमार विश्वास यांनी यावर कोणतंही उत्तर दिलेलं नाही, ते परदेशातून आल्यानंतरच काही सांगता येऊ शकतं, तर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा बरखा सिंह यांनी कुमार विश्वास सह त्यांच्या पत्नीला देखिल नोटीस जारी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
संबंधित महिला आप पक्षाचं कार्य पाहून भारावून गेली होती, आपचे लोकसभेचे अमेठीचे उमेदवार कुमार विश्वास यांच्या प्रचारासाठी या महिलेने काही दिवस अमेठीत घालवले, विशेष म्हणजे यावेळी तिचे दोन मुलं घरी होते, तरी देखिल या महिलेने पक्ष प्रेमापोटी अमेठीत प्रचार करण्याचं धाडस दाखवलं होतं.
कुमार विश्वासची ही कविता खूप गाजलीय
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.