अरुण जेटली

आई ओरडल्यामुळं बॅक बेंचर राहुल आज पहिल्या रांगेत!

आज अर्थसंकल्प मांडला जात असताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी चक्क पहिल्या रांगेत बसलेले दिसले... जेटलींचं भाषण सुरू झालं, तेव्हा ते मागच्याच बाकांवर होते. 

Jul 10, 2014, 06:38 PM IST

'गंगे'साठी 6337 करोड रुपयांचा निधी

आज संसदेत सादर झालेल्या अर्थसंकल्पात गंगा नदीवर आधारित विविध योजनांसाठी जवळपास 6337 करोड रुपयांचा निधीचा निर्धारित करण्यात आलाय. 

Jul 10, 2014, 03:25 PM IST

अर्थमंत्री अरुण जेटली यांचे 100 कोटींचे प्रेम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज संसदेत मांडला. 2014-2015च्या अर्थसंकल्पात अरुण जेटली यांचे 100 कोटींचे प्रेम दिसून आले. त्यांनी अनेक प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांची भरघोस तरतूद केली आहे. देशात 100 स्मार्ट शहरे बनविण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे जेटली यांनी सांगितले. त्यासाठी  7 हजार 600 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Jul 10, 2014, 03:10 PM IST

24 तास वीजेसाठी 'दीन दयाल ज्‍योति योजना' लागू

मोदी सरकारनं आपला पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलाय. या बजेटमध्ये 24 तास वीज उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देण्यात आलंय. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या पहिल्या बजेटच्या भाषणात नागरिकांना 24 तास उपलब्ध करून दिली जाईल.  

Jul 10, 2014, 02:23 PM IST

मोदी सरकारचं महाराष्ट्राला 'रिटर्न गिफ्ट'... पुण्याला लॉटरी!

महाराष्ट्रात मोदी सरकारला मिळालेल्या या यशाला ध्यानात ठेऊन अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काही महत्त्वाच्या तरतूदी करत सरकारनं राज्याला एक प्रकारे 'रिटर्न गिफ्ट'च दिलंय.

Jul 10, 2014, 02:14 PM IST

पाहा तुमच्या मासिक पगारावर आता किती वाचेल टॅक्स

केंद्रीय अर्थमंत्री यांनी लोकसभेत 2014-15 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केलाय. आपल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारकडून करदात्यांना दिलासा मिळालाय.

Jul 10, 2014, 01:52 PM IST

विकासासाठी थेट परकीय गुंतवणूक आवश्यक - अर्थमंत्री

देशाच्या संरक्षण क्षेत्रात थेट परकी गुंतवणुकीला (एफडीआय) वाव दिल्यानंतर विकासासाठी उत्पादन क्षेत्रात एफडीआय आणण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले.

Jul 10, 2014, 12:23 PM IST

अर्थव्यवस्थेवर जागतिक मंदीचा परिणाम - अरुण जेटली

 पंतप्रधान  नरेंद्र मोदी सरकारचा पहिला वहिला अर्थसंकल्प अरुण जेटली यांनी आज संसदेत सादर केला. देशाच्या अर्थव्यवस्थेवर जागतिक आर्थिक मंदीचा परिणाम झाला आहे. ही अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे लोकप्रिय निर्णयांची लोकांनी अपेक्षा ठेवू नये, असा इशारा अरुण जेटली यांनी दिला.

Jul 10, 2014, 11:51 AM IST

प्रमुख मुद्दे : बजेट 2014-15

अर्थमंत्री अरुण जेटली संसदेत अर्थसंकल्प 2014-15 सादर करत आहेत. हे मोदी सरकार आणि अर्थमंत्र अरुण जेटली यांचं पहिलंच बजेट आहे. सबका साथ सबका विकास, या मंत्रावर अर्थसंकल्प 2014-15 आधारलेला असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगत अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केलीय.

Jul 10, 2014, 11:25 AM IST