नवी दिल्ली: मोदी सरकारनं आपला पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलाय. या बजेटमध्ये 24 तास वीज उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देण्यात आलंय. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या पहिल्या बजेटच्या भाषणात नागरिकांना 24 तास उपलब्ध करून दिली जाईल.
त्यांनी म्हटलं की, यासाठी गावांमध्ये 'दीन दयाल ज्योति योजना' लागू केली जाणार आहे. ज्यासाठी 500 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. या पैशाचा वापर खेडेगावांमध्ये वीज पोहोचविण्यासाठी केला जाईल.
पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच सांगितलंय की, ते संपूर्ण देशात वीज उपलब्ध करून देण्यावर भर देतील आणि त्यासाठी ऊर्जेच्या इतर साधनांचाही वापर केला जाईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.