अकोला

अकोल्यात पावसामुळे काही भागात घरांचं मोठ नुकसान

मूर्तिजापूरमध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसानं काही भागात घरांचं मोठ नुकसान झालं आहे. तालुक्यातील राजनापूर खिनखीनी या गावात वादळी पावसानं अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले तर काही घरांची पडझड झाली. अचानक आलेल्या या वादळी पावसानं परिसरातील काही झाड़ं उन्मळून पडली. तर काही झाड़ं रस्त्यावर कोसळल्यानं रस्ता बंद होता. अचानक आलेल्या या वा-यामूळे राजनापूर खिनखिनीत सुमारे 20 ते 25 घरांचा नुकसान झालं. नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

May 29, 2017, 08:45 AM IST

अकोला, अमरावतीत मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात

जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात अचानक मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात झाली. दुपारी साडेचारच्या सुमारात पावसाळा सुरूवात झाली. वादळी वा-यासह पावसाळा सुरूवात झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. 

May 27, 2017, 07:18 PM IST

शिवसंपर्क अभियानाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे अकोल्यात

 विदर्भातल्या शिवसंपर्क अभिय़ानाच्या निमित्तानं आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अकोल्यात दाखल झाले आहेत. शहरात आल्यावर उद्धव ठाकरेंनी अकोला जिल्ह्यातल्या शेतक-यांशी संवाद साधला. कर्जमाफीसाठी सरकारवर दबाव वाढण्याचे आवाहन यावेळी उद्धव ठाकरेंनी केलं. याशिवाय पक्षाच्या अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यातले पदाधिका-यांशी उद्धव ठाकरेंसमोर आपलं म्हणणं मांडतील.

May 15, 2017, 01:13 PM IST

शेतकऱ्याचा मुख्यमंत्र्यांना अल्टीमेटम

विहिरीत उपोषणालला बसलेल्या भैरवनाथ जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना अल्टीमेटम दिला आहे. 

May 13, 2017, 09:05 AM IST

अकोल्यात एसटी बसला भीषण आग

 

अकोला : अकोल्यात एसटी बसला भीषण आग लागल्याची घटना घडलीये. सुरत-नागपूर महामार्गावर ही घटना घडली.

खामगावहून अकोल्याच्या दिशेने ही बस येत होती. यावेळी बसने अचानक पेट घेतला. या आगीत संपूर्ण बस जळून खाक दिली. 

Apr 17, 2017, 09:35 PM IST