शिवसंपर्क अभियानाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे अकोल्यात

 विदर्भातल्या शिवसंपर्क अभिय़ानाच्या निमित्तानं आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अकोल्यात दाखल झाले आहेत. शहरात आल्यावर उद्धव ठाकरेंनी अकोला जिल्ह्यातल्या शेतक-यांशी संवाद साधला. कर्जमाफीसाठी सरकारवर दबाव वाढण्याचे आवाहन यावेळी उद्धव ठाकरेंनी केलं. याशिवाय पक्षाच्या अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यातले पदाधिका-यांशी उद्धव ठाकरेंसमोर आपलं म्हणणं मांडतील.

Updated: May 15, 2017, 01:13 PM IST
शिवसंपर्क अभियानाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे अकोल्यात title=

अकोला : विदर्भातल्या शिवसंपर्क अभिय़ानाच्या निमित्तानं आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अकोल्यात दाखल झाले आहेत. शहरात आल्यावर उद्धव ठाकरेंनी अकोला जिल्ह्यातल्या शेतक-यांशी संवाद साधला. कर्जमाफीसाठी सरकारवर दबाव वाढण्याचे आवाहन यावेळी उद्धव ठाकरेंनी केलं. याशिवाय पक्षाच्या अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यातले पदाधिका-यांशी उद्धव ठाकरेंसमोर आपलं म्हणणं मांडतील.

येत्या १९ तारखेला नाशिकमध्ये शिवसेनेच्या पदाधिका-यांचा, शेतक-यांच्या मेळावा नाशिकला होणार आहे. त्यात सहभागी होण्याचंही  आवाहन यावेळी करण्यात आलं. दरम्यान विदर्भात खिळखिळी झालेली पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आयोजित केलेल्या या दौऱ्याचा किती फायदा होतो. याकडे सगळ्या विदर्भाचं लक्ष लागून राहिल आहे.