6,6,6,6,4,6,6,4.... ना स्पिनर पाहिला ना फास्टर, Robin Uthappa ने धु धु धुतलं; पाहा Video

Robin Uthappa Viral Video: हरारे हरिकेन्ससाठी (Harare Hurricanes) सलामीला उतलेल्या रॉबिनने 23 चेंडूत 53 धावा ठोकल्या आणि संघाला चांगली धावसंख्या उभी करून दिली. त्याचा ही खेळी पाहून क्रिडाप्रेमींच्या डोळ्याचं पारणं फेडलं. 

Updated: Jul 27, 2023, 04:59 PM IST
6,6,6,6,4,6,6,4.... ना स्पिनर पाहिला ना फास्टर, Robin Uthappa ने धु धु धुतलं; पाहा Video title=
zim afro t10 2023 robin uthappa

Durban Qalandars vs Harare Hurricanes: सध्या झिम्बॉब्वे येथे सुरू असलेल्या प्रियिमर लीगमध्ये (Zim Afro T10 2023) टीम इंडियाचा माजी स्टार फलंदाज रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) याने धुंवाधार फलंदाजी करत गोलंदाजांची भंबेरी उडवली. लीगच्या 17 व्या सामन्यात तुफान उथप्पाने आक्रमक फलंदाजीचं प्रदर्शन केलं. हरारे हरिकेन्ससाठी सलामीला उतलेल्या रॉबिनने 23 चेंडूत 53 धावा ठोकल्या आणि संघाला चांगली धावसंख्या उभी करून दिली. त्याचा ही खेळी पाहून क्रिडाप्रेमींच्या डोळ्याचं पारणं फेडलं. त्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे.

डरबन कलंदर (Durban Qalandars) विरुद्ध हरारे हरिकेन्स (Harare Hurricanes) यांच्यात 6 जुलै रोजी यांच्यात सामना  खेळवला जात होता. या सामन्यात  प्रथम फलंदाजी करताना हरारे संघाने 10 ओव्हरमध्ये 2 गडी गमावून 134 धावा केल्या होत्या. यामध्ये रॉबिन उथप्पाची खेळी महत्त्वाची ठरली. ना स्पिनर पाहिला ना फास्टर, जो येईल त्याला धु धु धुतलं. उथप्पाने 23 चेंडूत 5 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने 53 धावांची आतिशबाजी केली.

उथप्पाच्या (Robin Uthappa) या खेळीमुळे डर्बन कलंदरचा संघ प्रेशरमध्ये आला.  हरारे हरिकेन्सच्या प्रत्युत्तरात डर्बन कलंदर संघाला 10 षटकात 2 गडी गमावून 110 धावाच करता आल्या आणि सामना 24 धावांनी गमावला. सामना जिंकला त्याचबरोबर उथप्पाने सर्वांची मन जिंकली आहेत. उथप्पाच्या तुफानी फलंदाजीचा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा Video

रॉबिन उथप्पाने 2022 च्या सप्टेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. यानंतर त्याने आयपीएलमधूनही निवृत्ती घेतली. उथप्पाने 46 वनडेत 934 धावा केल्या तर त्याने 13 टी-ट्वेंटी सामन्यात 249 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर उथप्पाने 205 आयपीएल सामने खेळले आहेत. त्यात त्याने 4607 धावा केल्या आहेत. कोलकाता नाईट रायजर्स करून खेळताना उथप्पाने मैदान गाजवले आहेत.