Yuzvendra Chahal : महिला कुस्तीपटूने युझी चहलला गरागरा फिरवलं, खांद्यावर उचललं अन्... पाहा Video

Yuzvendra Chahal Viral Video : ‘झलक दिखला जा सीझन 11’ मधील सहभागींच्या पार्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये संगीता फोगट (Sangeeta Phogat) भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलला खांद्यावर घेऊन गरागरा फिरवताना दिसतेय. 

सौरभ तळेकर | Updated: Mar 3, 2024, 05:44 PM IST
Yuzvendra Chahal : महिला कुस्तीपटूने युझी चहलला गरागरा फिरवलं, खांद्यावर उचललं अन्... पाहा Video title=
Sangeeta Phogat lifted Yuzvendra Chahal

Sangeeta Phogat lifted Yuzvendra Chahal : टीम इंडियाचा अनुभवी ऑफ-स्पिनर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal ) गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाच्या संघापासून लांब आहे. एकीकडे संघातून चहलला वारंवार डावललं जात असताना दुसरीकडे चहलला बीसीसीआयने (BCCI) सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून डच्चू देण्यात आलाय. यंदाच्या वार्षिक करारात युझी चहलला सामील केलं गेलं नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अशातच आता चहलचा एक व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये युझी चहल कुस्तीपटू संगीता फोगटसोबत दिसतोय. ‘झलक दिखला जा सीझन 11’ मधील सहभागींच्या पार्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

‘झलक दिखला जा सीझन 11’ च्या पार्टीमध्ये संगीता फोगट (Sangeeta Phogat) भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलला खांद्यावर घेऊन गरागरा फिरवलं. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. महिला कुस्तीपटूने चहलला उचललं अन् भिंगरीसारखं गरागरा फिरवलं. संगीता फोगाटने चहलला खांद्यावर उचललं अन् त्याला फिरवलं. त्यामुळे चहलची चांगलीच दैना उडाल्याचं पहायला मिळालंय. चहलची पत्नी धनश्री वर्मा झलक दिखला जा शोच्या फायनलमध्ये पोहोचली होती. त्यानंतर झालेल्या पार्टीचा हा व्हिडीओ आहे.

झलक दिखला जा या शोमधील पाच फायनलिस्टपैकी धनश्री वर्मा एक स्पर्धक होती. चहलला चक्क येत असल्याचं पहिल्यानंतर अनेकांनी त्याला खाली उतरवण्याची विनंती केली. त्यानंतर चहलला तिने खाली उतरवलं. त्यावेळी त्याचं डोकं चक्रावल्याचं दिसत होतं. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी संताप देखील व्यक्त केला आहे.

धनश्रीचा फोटो व्हायरल

धनश्री पेशाने कोरियोग्राफर असून ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आता तिचा एक मिस्ट्री मॅनसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धनश्रीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये ती एका मिस्ट्री मॅनसोबत दिसत आहे. यामध्ये हा मिस्ट्री मॅन धनश्रीला कडकडून मिठी मारताना दिसतोय. त्यामुळे सध्या चहल आणि धनश्री यांच्या नात्यात मिठाचा खडा पडलाय का? असा सवाल विचारला जातोय. धनश्रीला मिठी मारणाऱ्या व्यक्तीचं नाव प्रतीक उतेकर असं आहे. प्रतीक पेशाने एक कोरियोग्राफर आणि डान्सर आहे.