होय, मला वाईट वाटलंय...सामना जिंकूनही का युझवेंद्र चहल नाराज?

राजस्थानचा गोलंदाज युझवेंद्र चहल निराश आहे. विजयानंतरही आपण खूश नसल्याचं स्वतः चहलने सांगितलं आहे. 

Updated: Apr 3, 2022, 12:39 PM IST
होय, मला वाईट वाटलंय...सामना जिंकूनही का युझवेंद्र चहल नाराज? title=

मुंबई : शनिवारी आयपीएलमध्ये झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा दारूण पराभव केला. राजस्थानचा या आयपीएलमधील हा सलग दुसरा विजय होता. या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थानच्या टीमने अव्वल स्थान गाठलं आहे. मात्र असं असूनही राजस्थानचा गोलंदाज युझवेंद्र चहल निराश आहे. विजयानंतरही आपण खूश नसल्याचं स्वतः चहलने सांगितलं आहे. 

कालच्या सामन्यात मुंबई फलंदाजी करत असताना युझवेंद्र चहलने डॅनियल सॅम्सची विकेट काढली. दरम्यान या विकेटनंतर तिसरी विकेट घेऊन चहल त्याची हॅटट्रिक पूर्ण करणार होता. मात्र तसं होऊ शकलं नाही. 

चहल हॅटट्रिक हुकली

चहने हॅटट्रिक बॉल मुरुगन अश्विनला टाकला. यावर त्याने मोठा शॉटही मारला. यावेळी हा बॉल करुण नायरकडे गेला. मात्र हा कॅच घेण्यात करूण नायरने चूक केली आणि चहलची हॅटट्रिक हुकली. यावेळी चहलने करूण नायरला फिल्डलर चिअर केलं.

सामना संपल्यानंतर चहल म्हणाला, "हॅटट्रिक पूर्ण न झाल्याने मला थोडं वाईट वाटलं, मात्र हा खेळाचा भाग आहे. आमचा मुख्य उद्देश सामना जिंकणं हा होता. मला हॅटट्रिक मिळाली असती तर मला आनंद झाला असता कारण माझी एकंही हॅटट्रिक नाहीये."