नवी दिल्ली : टीम इंडियाचा क्रिकेटर युवराज सिंह याच्यावर त्याची वहिनी आणि बिग बॉसच्या घरातील सदस्य आकांक्षा शर्मा हिने पुन्हा एकदा गंभीर आरोप लावले आहेत. आकांक्षाने युवराज सिंग आणि भाऊ जोरावर सिंग त्यांची आई शबनम सिंह यांच्यावर घरगुती हिंसेचा आरोप लावला आहे.
युवराज आणि त्याच्या कुटुंबियांवर पहिल्यांदाच आकांक्षाने आरोप लावले असे नाही. यापूर्वीही तिने असे आरोप लावले आहे. बिग बॉसच्या घरात राहताना आणि त्या घरातून बाहेर आल्यावर तिने आरोप करायला सुरूवात केली आहे. बिग बॉसच्या घऱातून बाहेर आल्यावर दिलेल्या एका मुलाखतीत युवराज सिंगवर तिने अनेक आरोप लावले. इतके नाही तर युवराजला गांजा पितांनाही पाहिले होते.
युवराजसिंग गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. अशात या खटल्यानंतर त्याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. युवराज सिंग याला दोन भाऊ आहेत. त्याच्या छोट्या भावाचे नावर जोरावर सिंग आहे. जोरावर याचे एक मार्च २०१४ मध्ये गर्लफ्रेंड आकांक्षा शर्मा याच्याशी लग्न झाले. चार महिन्यातच आकांक्षा आपल्या लग्नाला त्रासली. त्यानंतर तिने फारकतीचा निर्णय घेतला.
स्पॉटबॉयमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार आकांक्षाने युवराज त्याचा भाऊ आणि आई विरोधात घरगुती हिंसाचाराचे प्रकरण दाखल केले आहे. आकांक्षाची वकील स्वाती सिंग यांनी याबाबत सांगितले आता त्या या प्रकरणी काहीच सांगणार नाही. या प्रकरणाची सुनावणी २१ ऑक्टोबर रोजी आहे.