Mumbai Indians Post For Rohit Sharma: शुक्रवारी संध्याकाळी मुंबई इंडियन्सच्या टीमने मोठी घोषणा केली आणि चाहत्यांना मोठा धक्का दिला. मुंबई इंडियन्सने कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याकडे सोपवली आहे. मुंबईचा हा नियम चाहत्यांना मात्र रूचलेला नाही. दरम्यान या निर्णयानंतर मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला खास पद्धतीने धन्यवाद दिलेत. यावेळी MI ने व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडिओमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून रोहित शर्माचे संस्मरणीय क्षण दाखवण्यात आलेत.
रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर मुंबई इंडियन्सने खास व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओला पोस्टमध्ये लिहिलंय की, रोहित तू 2013 मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाला आहेस. तू आम्हाला विश्वास ठेवायला सांगितला. तू म्हणालास की, जिंकलो किंवा हरलो तरी आपल्याला हसावंच लागणार आहे. 10 वर्षे आणि 6 ट्रॉफी, आज आम्ही येथे आहोत. आमचा Forever Captain तुमचा वारसा निळ्या आणि रंगात सर्वांच्या लक्षात राहणार आहे. धन्यवाद कर्णधार
Ro,
In 2013 you took over as captain of MI. You asked us to In victories & defeats, you asked us to 10 years & 6 trophies later, here we are. Our your legacy will be etched in Blue & Gold. Thank you, pic.twitter.com/KDIPCkIVop— Mumbai Indians (@mipaltan) December 15, 2023
IPL 2013 च्या मोसमात रोहित शर्मा पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाला. टूर्नामेंटच्या मध्यंतरी रिकी पाँटिंगच्या जागी रोहित शर्माला कर्णधार बनवण्यात आलं होतं. त्याच वर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला पहिल्यांदा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. या वर्षी मुंबई इंडियन्स चॅम्पियन्स लीगचा विजेता ठरला होता.
यानंतर रोहित शर्माने कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्सला 4 वेळा चॅम्पियन बनवलं. रोहित शर्माने आयपीएल 2013 ते आयपीएल 2023 पर्यंत मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद कायम ठेवलं होतं. पण आता मुंबई इंडियन्सला सहाव्यांदा चॅम्पियन बनवण्याची जबाबदारी हार्दिक पांड्यावर असणार आहे.
मुंबई इंडियन्सने शुक्रवारी निवदेन जाहीर करत हार्दिक पांड्याच्या नावाची कर्णधारपदी घोषणा केली. यात मुंबई इंडियन्सचा ग्लोबल हेड महेला जयवर्धने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई इंडियन्सला सचिनपासून हरभजनपर्यंत आणि रिकी पासून रोहितपर्यंत नेहमीच असाधारन नेतृत्व लाभलं आहे. मुंबई इंडियन्सच्या यशात योगदान देण्याबरोबरच या सर्वांनी भविष्यात संघ मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. आता ही जबाबदारी हार्दिक पांड्यावर सोपवण्यात आली असून आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपद हार्दिक पाड्या सांभाळेल. असं महेला जयवर्धने यांनी या निवेदनात म्हटलंय.