मुंबई : WWE च्या दुनियेतील एक प्रसिद्ध चेहरा असणाऱ्या जॉन सिना यानं फक्त प्रोफेशनल रेसलिंगच नव्हे तर रुपेरी पडद्यावरही आपली छाप सोडली आहे. अफलातून अभिनयातून आणि दमदार अंदाजातून त्यानं कायमच चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.
रेसलिंग रिंगमध्ये धमाकेदार एंट्री घेण्यापासून ते अगदी स्टाईल स्टेटमेंटच्या बाबतीतही कायम आपलं वेगळेपण सिद्ध करणाऱ्या जॉन सिनाची एक वेगळी बाजू सध्या पाहायला मिळत आहे. जॉन सिना या सर्व कारणांसोबतच त्याच्या चाहत्यांना सरप्राईज देण्याच्या सवयीसाठीही ओळखला जातो.
पण, व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये मात्र त्यालाच सरप्राईज मिळाल्याचं दिसत आहे. जेव्हा सर्वांनाच सरप्राईज देणाऱ्या जॉन सिनालाच त्याचा एक लहान चाहता सरप्राईज देतो तेव्हा त्याची नेमकी काय अवस्था होते हे व्हिडीओतून पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ 2017 मधील असल्याचं कळत असून तो सध्या व्हायरल होत आहे.
सोशल मीडियामुळं समोर आलेल्य़ा या व्हिडीओमध्ये एक लहानगा त्याच्या आईच्या कॅन्सरसोबतच्या संघर्षाची कहाणी सांगतान दिसतो. आपण या काळात आईला कशा प्रकारे आधार दिला हेसुगद्धा तो सांगताना दिसतो. जॉन सिनाच्या (John Cena) सकारात्मकतेमुळं आपण संकटाच्या काळातही कशा प्रकारे तग धरू शकलो असं सांगताना हा लहानहा या सेलिब्रिटीचे आभार मानताना दिसतो.
It costs you nothing to be kind. You might just make someone’s day — and maybe their life.
Good on you, John Cena. Needed this today.
Break out the tissues… pic.twitter.com/YzX2vTUS7M
— Rex Chapma (@RexChapman) August 25, 2021
आपल्यावर असणारं चाहत्यांचं प्रेम आणि अचानकच समोर आलेले चाहते, पाहून जॉन सिनाच्या अश्रूंचा बांध फुटतो आणि तो अक्षरश: ढसाढसा रडताना दिसतो. व्हिडीओ पाहताना एका बलाढ्य व्यक्तीची ही भावनिक बाजू पाहणाऱ्यांच्य़ाडी डोळ्यात नकळतच पाणी आणते.