WTC Final | Team India च्या खेळाडूंनी हातावर का बांधल्यात काळ्या पट्ट्या?

महामुकाबला सुरु होण्याआधी राष्ट्रगीतादरम्यान भारतीय खेळाडूंनी हाताला काळ्या फिती लावल्या होत्या.

Updated: Jun 19, 2021, 06:30 PM IST
WTC Final | Team India च्या खेळाडूंनी हातावर का बांधल्यात काळ्या पट्ट्या? title=

साऊथम्पटन : भारताचे महान धावपटू आणि विविध स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या 'फ्लाइंग सिख' (Flying Sikh) मिल्खा सिंह (Milkha Singh) यांचं 18 जूनला रात्री निधन झालं. मिल्खा सिंह यांच्या मृत्यूमुळे विविध स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. मिल्खा सिंह यांच्या मृत्यूमुळे क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे. न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना (World Test Championship Final) खेळत असलेल्या टीम इंडियानेही (Team India) मिल्खा सिंह यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. (wtc final team india is wearing black armbands in remembrance of Milkha Singh)

या महामुकाबला सुरु होण्याआधी राष्ट्रगीतादरम्यान भारतीय खेळाडूंनी हाताला काळ्या फिती लावल्या होत्या. याद्वारे खेळाडूंनी मिल्खा सिंह यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच भारतीय खेळाडू काळ्या फिती लावून खेळणार असल्याची माहिती  बीसीसीआयने ट्विट करत  दिली. 

रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली हाताला काळीपट्टी लावून खेळताना दिसले. दरम्यान टीम इंडियाने पहिल्या सत्रात 2 विकेट्स गमावून 69 धावा केल्या. चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली मैदानात खेळत आहेत.

अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत (विकेटकीपर) , रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि  मोहम्मद शमी. 

संबंधित बातम्या : 

आपल्या सुंदर फोटोंमुळे चर्चेत आली Rishabh Pant ची लहान बहीण

WTC Final 2021 | मैदानात उतरताच कॅप्टनचा 'विराट' कारनामा, ठरला पहिला भारतीय