WTC final 2023 : शुभमन गिल याला आऊट देणारे पंच कोण आहेत? टीम इंडियाशी जुने 'वैर'

Shubman Gill controversial dismissal : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल ज्या प्रकारे बाद झाला त्यावरुन बराच खल होत आहे. वादग्रस्तपणे बाद करण्यात आल्यामुळे नव्याने वाद उफाळला आहे.

सुरेंद्र गांगण | Updated: Jun 11, 2023, 10:02 AM IST
WTC final 2023 : शुभमन गिल याला आऊट देणारे पंच कोण आहेत? टीम इंडियाशी जुने 'वैर' title=
WTC final Shubman Gill controversial dismissal

TC final Shubman Gill controversial dismissal : इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा सामना सुरु आहे. दरम्यान गिल याला ज्या पद्धतीने आऊट दिले त्याची जोरदार चर्चा होत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये आतापर्यंत मोठी चुसर दिसून आली आहे. मात्र, सामन्याच्या दुसऱ्या डावात टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल याला ज्या पद्धतीने आऊट करण्यात आले त्यावरुन हा निर्णय वादग्रस्त ठरला आहे. शुभमन गिल हा आऊट नसताना त्याला चुकीच्या पद्धतीने आऊट देण्यात आले आहे, असे  काही माजी क्रिकेटपटूंनी मत व्यक्त केले आहे. शुबमन गिल याला आऊट देणारे पंच कोण आहेत, ते जाणून घ्या.

शुभमन गिल याला आऊट देणारे पंच कोण?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने भारताला 444 धावांचे टार्गेट दिले होते. मात्र टार्गेटचा पाठलाग करताना टीम इंडियाला पहिला धक्का शुभमन गिल याच्या रुपाने बसला. स्कॉट बोलेंड याच्या एका चांगल्या चेंडूवर खेळताना शुभमन गिल याच्या बॅटला लागला आणि स्लिपमध्ये उभ्या असलेल्या कॅमेरुन ग्रीन याच्याकडे चेंडू गेला आणि त्याने कॅच घेतला. चेंडू जमिनीला लागल्याचे रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसत असले तरी तिसऱ्या पंचाने त्याला आऊट दिले.  हा निर्णय देणाऱ्या पंचाचे नाव रिचर्ड केटलब्रॉ (Richard Kettleborough) आहे.

रिचर्ड केटलब्रॉ यांचा टीम इंडियाशी जुना 'वाद' 

रिचर्ड केटलब्रॉ यांचा हा निर्णय टीम इंडियासाठी अत्यंत वाईट होता. विशेषत: आयसीसी ट्रॉफीच्या बाद फेरीत. रिचर्ड केटलब्रॉ  यांनी गेल्या काही वर्षांत भारताने खेळलेल्या जवळपास सर्वच ICC बाद फेरीत पंच म्हणून काम केले आहे. एवढेच नाही तर भारताने ते सामनेही गमावले आहेत.

 केटलब्रॉ यांच्या पंचगिरीमुळे टीम इंडियाने गमावले अनेक सामने 

रिचर्ड केटलब्रॉ यांच्या पंचगिरी करतानाच्या कालावधीत टीम इंडियाने अनेक मोठे सामने गमावले आहेत. यामध्ये श्रीलंकेविरुद्ध 2014 T20 विश्वचषक अंतिम फेरीतील पराभव, 2015 50 षटकांच्या विश्वचषक उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव आणि 2016 T20 विश्वचषक उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजकडून झालेला पराभव यांचा समावेश आहे. एवढेच नाही तर रिचर्ड केटलब्रॉ  यांच्या अंपायरिंगमध्ये भारताला 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता आणि त्यानंतर 2019 च्या वर्ल्ड कपच्या सेमीफायनल मॅचमध्येही पराभवाचा सामना करावा लागला होता. गेल्या वेळी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते, तेव्हाही रिचर्ड केटलब्रॉ  हे तिसरे पंच होते.