मुंबई : कसोटी क्रिकेटचा किंग कोण, याचं उत्तर आता काही दिवसांमध्ये आपल्याला मिळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याला (World Test Championship Final 2021) उद्यापासून (18 जून) सुरुवात होत आहे. टीम इंडिया (Team India) विरुद्ध न्यूझीलंड या अंतिम सामन्यात आमनेसामने भिडणार आहेत. अजिंक्यपदासाठी दोन्ही संघानी कंबर कसली आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाचा अष्टपैलू रवींद्र जाडेजाही (Ravindra Jadeja) उत्सुक आहे. जाडेजाला या सामन्यात विशेष कामगिरी करण्याची संधी आहे. (wtc final 2021 ravindra jadeja will achieve special position by scoring 46 runs will join Anil Kumble Kapil Dev club)
काय आहे विक्रम?
जाडेजा बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्यांवर दमदार कामगिरी करतो. जाडेजाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमधील स्थान निश्चित मानलं जात आहे. या सामन्यात जाडेजाला मानाच्या पंक्तीत स्थान मिळवण्याची संधी आहे.
जाडेजाला कसोटी क्रिकेटमध्ये 2 हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी अवघ्या 46 धावांची आवश्यकता आहे. 46 धावा करताच जाडेजाचं स्पेशल क्लबमध्ये समावेश होईल. जाडेजा 46 धावा करताच पाचवा भारतीय खेळाडू ठरेल ज्याच्या नावे कसोटीमध्ये 2 हजार धावा आणि 200 पेक्षा अधिक विकेट्सची नोंद आहे.
आतापर्यंत अनिल कुंबळे, कपिल देव. हरभजन सिंह आणि आर अश्विन या चौकडीने कसोटीमध्ये 2 हजारांपेक्षा अधिक धावा आणि 200 प्लस विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.
जाडेजाने आतापर्यंत 1 हजार 954 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 220 विकेट्सही घेतल्या आहेत. त्यामुळे जाडेजा ही कामगिरी करणार, याकडे सर्वांचच लक्ष असणार आहे.
अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, अश्विन, रविंद्र जडेजा, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.
अशी आहे न्यूझीलंडची टीम
केन विलियमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेवोन कॉन्वे, कोलिन डि ग्रँडहोम, मॅट हेनरी, काइल जेमिसन, टॉम लाथम, हेनरी निकोलस, एजाज पटेल, टिम साउदी, रॉस टेलकर, नील वैगनर, बीजे वाटलिंग आणि विल यंग.
संबंधित बातम्या :
WTC Final | महामुकाबल्यावर पावसाचं सावट, खोडा घातल्यास कोणता संघ ठरणार विजेता?