मुंबई: टीम इंडियाच्या स्टार खेळाडूची खिल्ली ज्येष्ठ खेळाडूनं उडवली आहे. आधी आर अश्विन आणि त्यानंतर आता टीम इंडियाचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजाची खिल्ली उडवली आहे. रविंद्र जडेजाला अत्यंत वाईट पद्धतीनं बोलल्यामुळे आता सोशल मीडियावर या दिग्गज क्रिकेटपटू, कमेंटेटरला ट्रोल केलं जात आहे.
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि टीकाकार संजय मांजरेकर अनेकदा खेळाडूंवर प्रतिक्रिया देतात. अलीकडेच त्यांनी टीम इंडियाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनबद्दल आपलं मत व्यक्त केलं ज्यामुळे त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता. आता त्यांनी रविंद्र जडेजाची खिल्ली उडवल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.
संजय मांजरेकर यांचं चॅट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या चॅटमध्ये ते रविंद्र जडेजाला इंग्रजी येत नसल्यानं त्याची खिल्ली उडवत आहे. सूर्यनारायण नावाच्या एका युझरने त्यांच्या चॅटचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. झी 24 तास या ट्वीटच्या सत्यतेची खातरजमा करीत नाही. पण हे ट्वीट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
I didn’t want to share this personal chat in public, even though it’s full to shit. But couldn’t help, coz ppl need to know this side of this man. @imjadeja would be proud of what he did to prove you wrong. @BCCI is this the kind of man you would want in your com panel in future? pic.twitter.com/AUjX301Foz
— soorya narayanan (@soorya_214) June 7, 2021
सूर्यनारायणच्या मेसेजनंतर संजय मांजरेकर संतापले आणि त्यांनी रविंद्र जडेजाची खिल्ली उडवली आहे. मी चाहता नाही समीक्षक आहे. तुमच्या सारखी मी पुजा करण्याची अपेक्षा माझ्याकडून करू नका. रविंद्र जडेजाला तर इंग्रजी येत नाही. त्यामुळे याचा अर्थ त्याला समजणार नाही.